JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / एका फोन कॉलमध्ये होईल तुमचं बँक अकाऊंट रिकामं, पश्चाताप टाळण्यासाठी लगेच करा 'हे' उपाय

एका फोन कॉलमध्ये होईल तुमचं बँक अकाऊंट रिकामं, पश्चाताप टाळण्यासाठी लगेच करा 'हे' उपाय

हल्ली विशिंग (Vishing) या प्रकाराचा वापर करून सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करतात. त्यापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

जाहिरात

सावधान! सायबर चोर ‘या’ चार मार्गानं करतात तुमची फसवणूक, एका चुकीमुळे व्हाल कंगाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. ऑनलाइन बँक फ्रॉडच्या (Online Bank Fraud) घटनांमध्ये झालेली मोठी वाढ याचं उदाहरण आहे. सध्याच्या ऑनलाइन, डिजिटल व्यवहारांच्या काळात अनेक सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) युजर्सच्या बँक खात्यातून (Bank Account) पैसे लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धतींचा वापर करत असतात. अनेकदा ऑफर्स, काही मोफत किंवा स्वस्त दरात वस्तू देण्याच्या बहाण्याने, ओटीपी मागून, मेसेज-लिंक्सद्वारे बँक फ्रॉड करतात. हल्ली विशिंग (Vishing) या प्रकाराचा वापर करून सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करतात. फ्रॉडच्या वाढत्या घटना पाहता सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. यामुळे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. विशिंगपासून बचाव कसा करायचा, ते आपण जाणून घेणार आहोत. विशिंग म्हणजे काय? विशिंगमध्ये गुन्हेगार तुमच्याशी फोन कॉलद्वारे बोलून तुमची गोपनीय माहिती मिळवतात. यामध्ये यूजर आयडी, लॉगइन (Log In) आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड, ओटीपी (OTP), यूआरएन (युनिक रजिस्ट्रेशन नंबर), कार्ड पिन, ग्रीड कार्ड व्हॅल्यू, सीव्हीव्ही किंवा जन्मतारीख, आईचं नाव यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती असते. गुन्हेगार बँक कर्मचारी असल्याचा किंवा बँकेच्या वतीने बोलत असल्याचा दावा करतात आणि ग्राहकांकडून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवतात. नंतर ही माहिती तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या खात्यामध्ये अफरातफर करण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्यासाठी वापरली जाते.  ‘टीव्ही 9 हिंदी’ने या संदर्भातील वृत्त दिलंय. Facebook लॉगिन करताच बँक अकाऊंट होणार रिकामं! तुम्ही तर करत नाही ना ‘ही’ चूक विशिंगपासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी? - तुमच्या बँकेला तुमच्या पर्सनल डिटेल्सची (Personal Details) माहिती असते. त्यामुळे तुमचं नाव आणि इतर बेसिक पर्सनल माहिती विचारणाऱ्या कॉलरपासून सावध राहा. शिवाय असा फोन कॉल आल्यास त्वरित बँकेला कळवा, ज्यामुळे तो फ्रॉड कॉल (Fraud Call) होता की नाही हे स्पष्ट होईल. - कोणत्याही मेसेजमध्ये, ईमेल किंवा एसएमएसवर दिलेल्या फोन नंबरवर तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँक अकाउंटबद्दलची माहिती देऊ नका. विशेषतः जर ते तुमच्या क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा बँक खात्याच्या संभाव्य सुरक्षा प्रकरणांशी संबंधित असतील तर विशेष काळजी घ्या आणि अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका. -  तुम्हाला मेसेजवर एखादा फोन नंबर दिला जातो, तेव्हा तुम्ही सर्वांत आधी तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक स्टेटमेंटच्या (Bank Statement) मागील फोन नंबरवर कॉल करून दिलेला नंबर बँकेचा आहे की नाही हे पडताळून घ्या. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. - तुमची वैयक्तिक किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती विचारणारा एसएमएस किंवा कॉल आल्यास, ती माहिती देऊ नका. अनोळखी नंबरवरून माहिती विचारली जात असेल तर ते देणं टाळा. तुम्ही त्या मेसेजला रिप्लाय दिल्यास किंवा लिंक दिली असेल तर त्यावर क्लिक केल्यास तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या