JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बिहारमध्ये RJD ला मोठा धक्का! बाहुबली आमदाराला 10 वर्षांची शिक्षा, 'हे' आहे कारण

बिहारमध्ये RJD ला मोठा धक्का! बाहुबली आमदाराला 10 वर्षांची शिक्षा, 'हे' आहे कारण

Anant Singh AK-47 Case: मोकामाचे आमदार अनंत सिंह हे नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूमध्ये होते. अनंत सिंह यांनी 2020 ची विधानसभा निवडणूक आरजेडीच्या तिकिटावर जिंकली. अनंत सिंग सध्या पाटणा येथील बेऊर तुरुंगात बंद आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 21 जून  : बिहारमधल्या (Bihar) मोकामा येथील आरजेडीचे दिग्गज नेते आणि आमदार अनंत सिंह (MLA Anant Singh) यांना लडमा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात एके-47 रायफल (AK-47 Rifle) आणि ग्रेनेड (Grenade) सापडल्याप्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Court) 10 वर्षांच्या तुरुंगवासाची (Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. अनंत सिंह यांच्या घरातून एके-47 आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. अनंत सिंह यांना मंगळवारी (21 जून 22) पाटण्यात (Patna) या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांच्या दाव्यावर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनंत सिंह यांना दोषी ठरवण्यात आलं आणि आता या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने निर्णय दिला आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह सध्या पाटणा येथील बेऊर कारागृहात आहेत. अनंत सिंह हे या पूर्वी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षात (JDU Party) होते. अनंत सिंह यांनी 2020 मध्ये आरजेडीच्या (RJD) तिकिटावर विधानसभा निवडणक लढवली होती आणि या निवडणुकीत ते विजयी झाले होते. परंतु, सध्या शस्त्रसाठा प्रकरणात ते कारागृहात आहेत. बिहारचे बाहुबली समजले जाणारे आमदार अनंत सिंह यांच्याविरुद्ध सुरू असलेला हा खटला बिहार सरकारने विशेष प्रकरणांच्या श्रेणीत ठेवला होता. आरोपीविरुद्ध या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) नियुक्त करण्यात आले होते. या खटल्याची जलद सुनावणी करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नियुक्त विशेष सरकारी वकिलांनी 13 पोलिसांना न्यायालयात हजर केलं होतं. तर दुसरीकडे बचाव पक्षातर्फे अनंत सिंह यांच्या वतीने 33 साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठा खुलासा; आता या राजकीय नेत्याकडे संशयाची सुई पोलीस छाप्यात आधुनिक शस्रास्त्रे उल्लेखनीय बाब म्हणजे, 2019 मध्ये पाटणा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनंत सिंह यांच्या लडमा येथील वडिलोपार्जित निवासस्थानात आधुनिक एके -47 रायफल, काडतुसं आणि हॅंड ग्रेनेड असा शस्त्रसाठा सापडला होता. या आधारावर 16 ऑगस्ट 2019 रोजी बारह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस, सरकारी आणि बचाव पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणाचा तपास बारह उपविभागाचे तत्कालीन एएसपी लिपी सिंह यांनी केला. त्यांच्या वतीने आमदार अनंत कुमार सिंह आणि केअरटेकर सुनील राम यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. यानंतर एमपी-एमएलए न्यायालयाने 15 ऑक्टोबर 2020 रोजी या प्रकरणात आमदार अनंत सिंह आणि केअरटेकर सुनील राम यांच्यावर आरोप निश्चित केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या