JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कोरोनाबाधित बापाचं अमानुष कृत्य, छातीवर चढून घेतला 9 वर्षाच्या मुलाचा जीव

कोरोनाबाधित बापाचं अमानुष कृत्य, छातीवर चढून घेतला 9 वर्षाच्या मुलाचा जीव

दारुच्या नशेत असणाऱ्या एका बापानं स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव (Man Killed his Son) घेतला आहे. ही सर्व घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडली असून तिच्या ओरडण्यानं आसपासचे लोक जमा झाले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 24 एप्रिल : असं म्हणतात, की आपल्या मुलांना साधी शिंक जरी आली तरीही आई वडिलांचा जीव घाबरा होतो. मात्र, याच नात्याला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. या घटनेमध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या एका बापानं स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव (Man Killed his Son) घेतला आहे. ही सर्व घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडली असून तिच्या ओरडण्यानं आसपासचे लोक जमा झाले आणि पोलिसांनी बोलावण्यात आलं. यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. ही घटना आहे बिहारच्या पाटणामधील (Patna) कंकडबाग ठाण्याच्या मलाही पकडी परिसरातील. या घटनेनमध्ये 9 वर्षाच्या नितेशचा जीव त्याच्याच नशेत असणाऱ्या बापानं घेतला आहे. बहिण मानवीनं हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. मानवीनं दिलेल्या माहितीनुसार, नितेश आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता आणि रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. तो लवकर घरी न आल्यानं वडील रागात होते आणि बहिणही त्याची वाट पाहात होती. नितेश पहाटे चार वाजता घरी परतला. यानंतर वडिलांनी नितेशचे हातपाय बांधून त्याला जबर मारहाण केली. यानंतर तो मुलाच्या छातीवर चढला आणि तेव्हापर्यंत छातीवर उभा राहिला जोपर्यंत नितेशचा जीव गेला नाही. यानंतर बहिणीनं नितेशला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठालाच नाही, त्यामुळे मानवीनं जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी आरोपीला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोरोनातून बरं झालेल्यांना 6 महिन्यांपर्यंत मृत्यूचा अधिक धोका, अभ्यासकांचा दावा अटक केल्यानंतर समजलं, की आरोपी कोरोना पॉझिटिव्ह - मुलाचा जीव घेतल्याप्रकरणी आरोपीला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा समजलं की आरोपी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आहे. या गोष्टीची माहिती मिळताच ठाण्यात एकच गोंधळ झाला. यानंतर आरोपीला अटक केलेल्या सर्व पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. पत्नीचाही घेतला आहे जीव - पोलिसांनी अधिक तपास केला असता अशी माहिती मिळाली, की आरोपीची तीन लग्न झाली आहेत.पहिल्या पत्नीचं नाव अनिता असून ती खगडियामध्ये राहाते. तिसरी पत्नी मन्तोषी सध्या आरोपीसोबतच राहात होती. तर, दुसरी पत्नी शांतीचा याआधीच मृत्यू झाला आहे. मृत नितेश आणि मानवी दुसऱ्या पत्नीचीच मुलं आहेत. मानवीनं वडिलांवर आरोप करत म्हटलं, की शांतीलाही त्यानंच मारलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या