JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बुंदीचे लाडू विकण्याची मोठी शिक्षा, कोर्टाकडून 3 महिन्यांचा तुरुंगवास

बुंदीचे लाडू विकण्याची मोठी शिक्षा, कोर्टाकडून 3 महिन्यांचा तुरुंगवास

जाणून घ्या काय आहे प्रकरण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Gwalior Court News: ग्वाल्हेर, 13 मार्च : विशेष न्यायिक मजिस्ट्रेटने एका लाडू विकणाऱ्या दुकानदाराला तुरुंगात पाठवलं आहे. याशिवाय 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपी विरोधात 2011 पासून प्रकरण पेंडिग होतं. विशेष केसच्या अंतर्गत ही ट्रायल आज संपली. यानंतर आरोपीला जामीनही मिळाला. 27 जानेवारी 2010 मध्ये खाद्य निरीक्षण आपल्या टीमसह मुरारच्या भगवती कॉलनीत पोहोचले. येथे बंसल मिष्ठान्न भंडारात आपल्याबाबत माहिती सांगत खाद्य सामग्रीची तपासणी केली. येथील बुंदीच्या लाडूचे नमुने घेतले. हे नमुने लॅबमध्ये तपासासाठी पाठवले. भेसळयुक्त लाडू आणि विना परवाना दुकान चालवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. येथीस लाडू भेसळयुक्त नाहीत असं सिद्ध करणं त्यांना शक्य झालं नाही. मात्र परवाना नसल्यामुळे ते दोषी आढळले. आरोपीने स्वत:च्या बचावादाखल पहिल्यांदाच ही चूक झाल्याचं सांगितलं. त्याला कायद्याची माहिती नव्हती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. शेवटी कोर्टाने दोन्ही पक्षांचं ऐकलं आणि तीन महिन्याची शिक्षा सुनावली. ही शिक्षा परवानाशिवाय व्यवसाय करण्यासाठी ऐकवण्यात आली आहे. हे ही वाचा- धक्कादायक! भरस्त्यात ओढत नेत युवकांच्या टोळक्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य चेक बाऊंन्स प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा… न्यायिक मॅजिस्ट्रेटने चेक बाऊंन्स प्रकरणात एका व्यक्तीला सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 7 लाख 45 हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेतून कर्ज घेण्याच्या बदल्यात आरोपींनी धनादेश दिला होता, जो बाऊन्स झाला. त्याचीही माहिती दिली, परंतु कर्जाचे पैसे परत केले नाहीत. मुरैना जिल्ह्यातील नूराबाद येथील रहिवासी असलेल्या राजवीर सिंग यांनी एचडीएफसी बँकेकडून 4.75 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेत हस्तांतरित केलेले धनादेश देण्यात आले. चेक क्लिअरन्ससाठी ठेवला असता खात्यात शिल्लक नसल्यामुळे तो बाऊन्स झाला. बँकेने न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. सुनावणीनंतर न्यायालयाने राजवीर सिंगला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. ७ लाख ४५ हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या