JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमासाठी काहीही! कोरोना रुग्णांना भलतंच इंजेक्शन देऊन Remdesivir चोरायची नर्स, प्रियकर करायचा ब्लॅकमध्ये विक्री

प्रेमासाठी काहीही! कोरोना रुग्णांना भलतंच इंजेक्शन देऊन Remdesivir चोरायची नर्स, प्रियकर करायचा ब्लॅकमध्ये विक्री

एक नर्स रुग्णालयात दाखल रुग्णांना नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत होती आणि आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये (Black Marketing of Remdesivir Injection) विकत होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 24 एप्रिल : कोरोना काळात (Coronavirus) रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसंच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशात आता याच संदर्भातील आणखी एक घटना समोर आली आहे. एक नर्स रुग्णालयात दाखल रुग्णांना नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत होती आणि आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये (Black Marketing of Remdesivir Injection) विकत होती. ही घटना आहे मध्य प्रदेशच्या भोपाळमधील जे के रुग्णालयातील. इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी जेव्हा एका तरुणाला ताब्यात घेतलं तेव्हा या अजब प्रेम कथेचं सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं, की गिरधर कॉम्पलेक्स दानिशकुंज येथील रहिवासी असलेल्या झलकन सिंह याची प्रेयसी शालिनी जे के रुग्णालयात नर्सिंह स्टाफ आहे. आरोपी नर्स सध्या फरार आहे. चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं, की त्याची प्रेयसी रुग्णांना रेमडेसिवीरच्या जागी दुसरं नॉर्मल इंजेक्शन देत होती. रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याजवळच ठेवत होती. हे इंजेक्शन तो 20 ते 30 हजारात विकत होता. आरोपीनं सांगितलं, की त्यानं जे के रुग्णालयातीलच डॉक्टर शुभम पटेरिया यांनाही हे इंजेक्शन 13 हजार रुपयात विकलं होतं. याचं पेमेंट त्याला ऑनलाईन दिलं गेलं होतं. Remdesivir चा काळाबाजार सुरूच! 22 हजारांना इंजेक्शन विकणारे पोलिसांच्या ताब्यात रुग्णाचा नातेवाईकांनी दिली माहिती - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांसोबत झलकननं इंजेक्शनचा व्यवहार केला होता. मात्र, किमतीवरुन त्यांच्यात बराच वेळ वाद झाला आणि याचदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. याच कारणामुळे नाराज झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर झलकनवर लक्ष ठेवलं जात होतं. त्याच्या खिशामध्ये इंजेक्शन असल्याची खात्री होताच तात्काळ पोलिसांनी त्याला घेरलं. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाख करत आरोपीला अटक केली आहे. प्रकरणातील आणखी एक आरोपी झलकनची प्रेयसी शालिनी वर्माचा शोध सुरू आहे. याप्रकरणी डीआयजी इरशाद वली म्हणाले, की जीवनरक्षक इंजेक्शन रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पाऊलं उचलली जात आहेत. शहरात सगळीकडेच अशा आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना मोठा दंड ठोठावला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या