एका ट्विटने प्रकरण पोलिसांवरच उलटलं
बंगळुरू, 11 डिसेंबर : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लेट नाईट फिरणाऱ्या एका जोडप्याकडून पोलिसांनी 1 हजार रुपयांचा वसूल केला होता. हे जोडपे त्यांच्या घराबाहेर फिरत होते. दरम्यान दोन पोलीस आले आणि दंडाच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे घेतले. या जोडप्याने संपूर्ण घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांवर उलटल्याचे पाहायला मिळाले. पीडित तरुणाकडून सलग 15 वेळा ट्विट कार्तिकने सलग 15 ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की तो त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून पत्नीसोबत परतत होता. तो त्याच्या घरापासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असताना गस्ती पथकाने येऊन त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने ओळखपत्रही दाखवले, मात्र दोन्ही पोलिसांनी त्याचा फोन घेतला आणि त्याची चौकशी सुरू केली. कार्तिकने सांगितले की, यादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने चलन पुस्तकासारखे काहीतरी काढले आणि आधार क्रमांक नोंदवायला सुरुवात केली. नाईट रोमिंगच्या नावाखाली कापले चलन! यावर कार्तिकने पोलिस कर्मचार्यांनाही चलान कशासाठी दिले जात आहे, असा सवाल केला, तेव्हा पोलिसांनी सांगितले की, रात्री 11 वाजल्यानंतर रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. यावर या जोडप्याने आपल्याला अशा कोणत्याही नियमाची माहिती नसल्याचे सांगितल्यावर पोलिस कर्मचारी म्हणाले की, तुमच्यासारख्या सुशिक्षितांना या नियमांची माहिती असायला पाहिजे. वाचा - आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं पोलिसांनी दाम्पत्याकडून हजार रुपये दंड वसूल केला यानंतर जोडप्याने प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, बोलणी झाल्यावर पोलिसांनी एक हजार रुपये देण्यास होकार देत ऑनलाइन पेमेंट घेतले. घटनास्थळावरून बाहेर पडल्यानंतर तरुणाने बंगळुरू पोलिसांना टॅग केले आणि पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुसरीकडे, तरुणाच्या ट्विटनंतर, उत्तर पूर्व डीसीपी अनुप ए शेट्टी यांनी कार्तिकच्या संदेशाला उत्तर दिले आणि लिहिले की ही बाब आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यानंतर काही वेळातच, बेंगळुरू पोलिसांनी ट्विट केले की या घटनेला जबाबदार असलेल्या दोन पोलिसांची ओळख पटली आहे, त्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.