JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 29 वर्षीय डॉक्टर पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; विरोध केल्याने थेट.. बीडमधील घटना

29 वर्षीय डॉक्टर पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; विरोध केल्याने थेट.. बीडमधील घटना

परळी तालुक्यात डॉक्टर पतीने आपल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात

सांकेतिक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 2 जानेवारी : शिक्षणाने माणूस खरच संस्कारित होतो का? असा प्रश्न समाजात अनेकदा उपस्थित केला जातो. याचं कारण म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये वाढत्या गुन्हेगारीच प्रमाण. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. एका उच्चशिक्षित व्यक्तीनेच आपल्या पत्नीसोबत भयानक कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉक्टरने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार केला. तसेच मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची घटना परळी तालुक्यातील धर्मापुरीत घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. आणि त्याच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक काय आहे प्रकरण? परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे बी.एच.एम.एस शिक्षण घेतलेली व्यक्ती खाजगी प्रॅक्टिस करीत आहे. या व्यक्तीने 29 वर्षीय पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला. पीडित महिलेने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात गुरनं 313/2022 कलम 377, 498 अ, 323, 504,34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर आणि त्यांचे 7 नातेवाईक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड हे करीत आहेत. वाचा - वर्षभरापूर्वी लग्न, सासरचा जाच अन् पतीचं पत्नीसोबत भयानक कांड; जालन्यातील घटना धर्मापुरीतील नवीन वर्षातील अत्याचाराची पहिली घटना गेल्या काही वर्षांपासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे आकड्यांवरुन समोर येत आहे. यापूर्वीही महिलांवरील अत्याच्याचारांच्या घटनेले बीड जिल्हा हादरला आहे. काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील मुख्यरस्त्याच्या बाजूला 70 वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. औरंगाबादकडे जाणाऱ्या मुख्यरस्त्यावर एक 70 वर्षीय वृद्ध महिला फळविक्रीकरून उदरनिर्वाह करते. तसेच रस्त्याच्या बाजूलाच आडोस्यात ती राहते. याच संधीचा फायदा घेऊन पहाटे 3 वाजेच्या दरम्यान एका नराधमाने वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला. तसेच आरोपीने पिडीतेला जबर मारहाण केली. पिडीतेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तिकडे धाव घेतली. अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या