धुळे, 26 ऑक्टोबर : धुळे (Dhule) शहरातील अॅक्सिस बँकेतील (Axis Bank) बँक खाते हॅक (Bank Account Hack) करून दोन कोटी 6 लाखांची रक्कम लंपास करणाऱ्या दिल्ली (Delhi) येथील टोळीचा धुळे पोलिसांनी (Dhule Police) पर्दाफाश केला आहे. धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने राजधानी दिल्लीत कारवाई करत एका नायजेरियन हॅकरसह (Nigerian hacker) पाच जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अॅक्सिस बँकेतील धुळे विकास बँकेच्या चालू खात्यातून दिनांक 9 जून 2020 रोजी अज्ञात हॅकर्सने दोन कोटी 6 लाख 50 हजार 165 रुपये लांबविले होते. यानंतर शाखाधिकारी धनेश सगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करुन तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार; आता हे आहे कारण
पोलिसांनी सुरुवातीला हॅकर्सने रक्कम 18 बँकांच्या 27 खात्यांमध्ये वर्ग केली होती. नंतर सदरच्या 27 खात्यातून पैसे 69 खात्यात व तेथून 21 खात्यात अशा प्रकारे देशभरातील सुमारे 117 विविध बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली होती. परंतू, पोलिसांनी वेळीच ही सर्व खाती गोठवून 88 लाख 81 हजार 173 रुपये थांबविले. तपासात पोलिसांना एका संशयिताचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्या मोबाइलच्या आधारे पोलीस दिल्लीमधील नितीका दीपक चित्रा (वय 30,रा.जुने महाविर नगर, नवीदिल्ली) हिला ताब्यात घेतले. यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.
राष्ट्रवादीत जाताच ‘चॉकलेट’वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार
नितीकाचा पती दीपक राजकुमार चित्रा (वय 29 रा.नवी दिल्ली) हा टोबॅचिकू जोसेफ ओकोरो उर्फ प्रेस (वय 23, ग्रेट नोएडा, यू.पी.) नावाच्या नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात होता. प्रेस हा देशभरातील कुठल्याही बँकेचे खाते हॅक करुन त्यातील रक्कम विविध बँक खात्यात वर्ग करायचा आणि दीपक, नितीका चित्रा, रमनकुमार दर्शनकुमार (वय 30, रा.तिलक नगर, दिल्ली), अवतारसिंग उर्फ हॅप्पी वरेआमसिंग (वय 28, तिलकनगर, नवी दिल्ली) यांच्या मदतीने सर्वसामान्य लोकांकडून ’के.वाय.सी’ कागदपत्र घेऊन विविध बँकांमध्ये बनावट खाते उघडायचे आणि त्या खात्यातनू पैसे काढायचे. अशा प्रकारे ही टोळी कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, धुळे LCB पोलिसांनी एकूण रक्कम पैकी 88 लाख रूपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. LCB पथकाने सायबर सेलची मदत घेत दिल्लीत कारवाई केली. पोलिसांनी एका नायझेरियन हॅकरला अटक केली असून या टोळीकडून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून अजून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे सरकारची मोठी घोषणा, कोरोना चाचणीच्या दराबद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवतं, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, उमेश बोरसे, सारीका कोडापे, हनुमान उगले, हवालदार संजय पाटील, अशोक पाटील, संदीप पाटील व सायबर तज्ञ व्रजेश गुजराथी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्याची उकल केली.