JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'पॉर्न व्हिडिओ पाहिला म्हणून अलर्ट, पुन्हा पाहिला तर कारवाई होईल'; पोलिसांचा मेसेज होतोय व्हायरल

'पॉर्न व्हिडिओ पाहिला म्हणून अलर्ट, पुन्हा पाहिला तर कारवाई होईल'; पोलिसांचा मेसेज होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर पोलिसांना केलेला हा मेसेज व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 24 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार इंटरनेटवर अश्लील पॉर्न व्हिडिओ पाहण्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांनंतर खरंच अशी घटना घडल्याचा एका मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील हेल्पलाइन क्रमांक 1090 च्या नावाने व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे मंगळवारी गोंधळ उडाला. या एसएमएसमध्ये लिहिलं होतं की, ‘इंटरनेट युजर.. उत्तर प्रदेश पोलीस 1090 तुम्हाला अश्लील पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या गुन्ह्याखाली पूर्व सूचना देत आहे. पुढील वेळेस अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी सूचना नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल’. हा मेसेज व्हायरल होताच सोशल मीडियावर गोपनीयतेच्या अधिकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावरुन लोकांनी उत्तर प्रदेश पोलिसांना खूप ट्रोल केलं आहे. हेल्पलाइन क्रमांक 1090 यांनी 12 फेब्रुवारी रोजी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर हा वाद सुरू झाला. यादरम्यान मीडियाला सांगण्यात आलं की, इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ पाहू नये यासाठी लोकांना जागरुक करण्यात येईल. अशा साइटवर जाणाऱ्यांना एक सूचना देणारा मेसेज जाईल. यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानुसर जर पॉर्न व्हिडिओ वा साइटवर जाणं बेकायदेशीर नसेल तर सूचना व अलर्ट कशाबद्दल? हे ही वाचा- बायकोच्या कटकटीपासून वाचण्याची ट्रिक; हर्ष गोयंका यांनी शेअर केला VIDEO काहींनी तयार केले मीम्स यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 1090 या हेल्पलाइन क्रमांकाडून ट्वीट करुन स्पष्ट करण्यात आलं की, साइकोग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित इंटरनेटवर उपलब्ध साहित्य सर्च करणाऱ्यांना पॉपअप मेसेजच्या माध्यमातून अलर्ट करण्यात येईल. काही जणांनी या माहितीच्या आधारावर फेक मेसेज व्हायरल केला.यावर एडीजी नीरा रावत यांनी सांगितलं की, हा मेसेज फेक असून याचा तपास केला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या