नागपूर, 17 मे: अगदी लहान वयापासून हाती येणाऱ्या मोबाइलचे दुष्परिणाम आता दिसत आहेत. एवढंच नाही तर मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचंही समोर आलं आहे. मोबाइलमुळे अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? याबाबत वडिलांनी तिला विचारणा असता तिनं जेवणात विष कालवलं. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे शनिवारी घडली. हेही वाचा… एका ट्वीटनंतर कॅन्सर रुग्णापर्यंत मुंबईहून सोलापूरला अशी पोहोचली औषधी! याबाबत मिळालेली माहिती अशी की, नववीत शिकणाऱ्या मुलीकडे मोबाइल आढळल्याने वडिलांनी तिला विचारणा केली. याचा राग मनात धरुन मुलीने जेवणात विष कालवलं. हे विषयुक्त जेवण केल्याने संबंधित मुलीच्या बहिणीची प्रकृती बिघडल्याने तिला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करतात. त्यांच्या मुलीकडे त्यांना अचानक मोबाइल आढळला. मोबाइलबद्दल त्यांनी विचारले असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढंच नाही तर वडिलांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर ती घरातून बाहेर गेली. सायंकाळी ती पुन्हा घरी आली. या वेळी आईवडील घराच्या छतावर बसले होते. हीच संधी साधून मुलीने जेवणात विष कालवलं. दरम्यान, तिच्या बहिणीला भूक लागली. तिने जेवण केलं. हेही वाचा.. पुण्यात कोरोनाच्या धास्तीने 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रिपोर्ट आला निगेटिव्ह घरात उग्र वास येत होता. मात्र, बहिणीने त्याकडे दुर्लक्ष करून जेवण केलं. नंतर तिला मळमळ आणि उलट्या झाल्या. नंतर वडिलांनी तिला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले. मुलीला याबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार तिनं सांगितला.