JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 25 वर्षांचं प्रेम, मृत्यूनंतरही पत्नीला सोडलं नाही; शिक्षकाच्या कृत्यामुळे शेजारच्यांमध्ये दहशत

25 वर्षांचं प्रेम, मृत्यूनंतरही पत्नीला सोडलं नाही; शिक्षकाच्या कृत्यामुळे शेजारच्यांमध्ये दहशत

शिक्षकाच्या कृत्यामुळे शेजाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 ऑगस्ट : डिंडोरीमध्ये एका शिक्षकाचं अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. या शिक्षकाचं आपल्या पत्नीवर अतूट प्रेम होता. इतकं की, मृत्यूदेखील दोघांना वेगळं करू शकला नाही. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा याबाबत कळालं तर त्यांना धक्काच बसला. त्यांनी आधी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एकलं नाही, म्हणून कलेक्टरकडे गेले. प्रशासनाने शिक्षकाच्या घरात खणण केलं. आणि पत्नीचा मृतदेह पाहून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.

पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाकडून खोदकाम सुरू असताना शिक्षकाने याचा विरोध केला. मी मानव आणि दानव दोघांना समाज समजतो, असं यावेळी ते म्हणत होते. डिंडोरीमध्ये ओमकार दार मोगरे राहतात. ते प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. 25 वर्षांपूर्वी त्यांनी रुक्मिणीसोबत लग्न केलं होतं. त्यांना मूल झालं नाही. ओमकारसाठी रुक्मिणी सर्वकाही होती. मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांना सिकलसेलचा आजार होता. पत्नीच्या निधनानंतर शिक्षकाने तिचा मृतदेह घरातच दफन केला.

पहाटे 3 वा. उठला; 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चिरला गळा, सकाळी म्हणाला…

संबंधित बातम्या

शेजारच्यांकडून आक्षेप… मंगळवारी रात्री जेव्हा शेजारच्यांना याबाबत कळालं तर त्यांना धक्काच बसला. महिलांसह मुलंही घाबरले. सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी कारवाईस नकार दिला. शेवटी बुधवारी शेजारी कलेक्टरकडे गेले. येथे एसडीएम यांच्या निर्देशानुसार, घरात खोदून मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश दिला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या