file photo
पुणे, 10 जानेवारी : एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी आईला CCTV च्या आधारे मंचर पोलिसांनी तीन तासांत पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिका नकोशी झालेल्या जन्मदात्या आईचा शोध घेऊन CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी तिला अटक केली. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव…’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेच तिला नकोशी केलं…! आई गं.. तु वैरिणी का गं झालीस …! हेच शब्द तोडांतुन येत जरी नसले तरी डोळ्यात मात्र सहज दिसत होते. मंचर शहारातील छत्रपती शिवाजी चौकातल्या कचरा कुंडीत पिशवीत गुंडाळुन नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या आईचा मंचर पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतले आहे. नराधम आईच्या पोटात वाढणारी ही बालिका सुंदर जगात आली. पण तिच्या आईला ती जन्मताच नकोशी झाली अनं जन्मताच तिला अनाथ व्हावं लागलं. तिच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ही बालिका सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा - क्षुल्लक कारणातून तरुणाचा काकावर हल्ला, घडलं भयानक, 12 दिवसांनी आरोपीला अटक पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर आता गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ - पुण्यात कोयता गँगनंतर आता गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली आहे. दौंड तालुक्यातील राहू येथे एक जण दोन गावठी पिस्तूल विकण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गावठी पिस्तूल विकायला आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तुषार काळे हा राहू येथे गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. सोमवार 9 जानवारीला तुषार काळे हा सायंकाळच्या सुमारास एका हॉटेलच्या ठिकाणी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 गावठी पिस्तूल मिळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.