JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Aaftab Poonawala : श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची तिहार जेलमध्ये विशेष कक्ष, 24 तास सुरक्षा यंत्रणा

Aaftab Poonawala : श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची तिहार जेलमध्ये विशेष कक्ष, 24 तास सुरक्षा यंत्रणा

श्रद्धा वालकरची हत्या केलेला आरोपी आफताबची आता तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 नोव्हेंबर : श्रद्धा वालकरची हत्या केलेला आरोपी आफताबची आता तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आफताब तिहार जेलमधील क्रमांक 4 मध्ये राहणार आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी आफताबला 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. यासोबतच आफताबवर तुरुंग प्रशासनाचे लोक नेहमीच लक्ष ठेवणार आहेत. आफताब तुरुंगात फारशी हालचाल करू शकणार नाही, त्याला कोठडीतून बाहेर पडण्यास काही काळ बंदी असेल. सध्या तुरुंगात त्याचे मेडिकल सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा :  विवाहित प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने चढला पारा; पुण्यातील प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस

आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयात नेले होते. रुग्णालयातूनच तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. यावेळी त्याची तिहार तुरुंगात रवानगी झाली आहे. विशेष पोलीस आयुक्त सागरप्रीत हुडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आंबेडकर रुग्णालयात न्यायालय स्थापन करण्यात यावे, अशी विनंती न्यायदंडाधिकाऱ्यांना केली.

संबंधित बातम्या

पोलिसांनी म्हणाले की, आफताबची आयपीसी कलम 365/302/201 अंतर्गत पॉलिग्राफ चाचणी 25 नोव्हेंबरपर्यंत करता आली नाही. विशेष पोलिस आयुक्त हुड्डा म्हणाले की, आम्हाला अद्याप श्रद्धाच्या मृतदेहाचा डीएनए अहवाल मिळालेला नाही. तर, 16 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा डीएनए नमुना घेतला आहे. पोलीस हा डीएनए जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या डीएनएशीही जुळवून पाहणार आहेत.

जाहिरात

आफताबच्या वडिलांचाही या घटनेशी संबंध

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी आफताब वसईहून दिल्लीला आपले सामान हलवत असताना, तो आपल्या वडिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता का, असा संशय घेण्यात आला आहे. दरम्यान आफताबला वडिलांनी सामान हलवायला मदत केली का? या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा :  घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव

जाहिरात

श्रद्धाचे तक्रार पत्र समोर आल्यानंतर, आफताबचे वडील आणि इतर कुटुंबीयांना आफताबच्या गुन्ह्याची माहिती नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. की वडील आफताबच्या वाईट सवयींना पाठीशी घालत होते याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

दिल्ली पोलिस आफताब नशेखोर होता का? याचाही तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यासाठी तो वसई, मीरा रोड आणि भाईंदरच्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या