जयपूर 17 एप्रिल : हत्येच्या (Murder News) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. मात्र, अशात आता हत्येची एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका अल्पवीयन मुलानं आपल्याच वडिलांची कुऱ्हाडीनं कापून हत्या (Son Kills Father) केली आहे. ही घटना आहे राजस्थानच्या कोटामधील इटावा कस्बे येथील. या अल्वयीनं मुलानं कुऱ्हाडीनं केलेल्या वारात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. 50 रुपयांसाठी बेरोजगार मुलानं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांची चाकूनं भोसकून हत्या मुलानं का उचललं टोकाचं पाऊल - मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांच्या वागण्यामुळे वैतागलेल्या या अल्पवयीन मुलानं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं कुऱ्हाडीनं आपल्या वडिलांच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार केले, यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. बुलडाण्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिला एसटी वाहकाचा मृतदेह; घातपाताचा संशय मृत आबिद उर्फ पपया इटावा ठाण्यात हिस्ट्रीशीटर होता. तो नशेमध्ये आपल्या मुलाला आणि कुटुंबीयांना मारहाण करत असे. तो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं नेहमीच त्रास देत असे. याच कारणांमुळे वैतागलेल्या मुलानं आबिद गुरुवारी रात्री दारुच्या नशेत झोपलेला असताना हल्ला करून त्याची हत्या केली. पोलीस एफएसएल टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. एफएसएल टीमनं याठिकाणी सँपल घेऊन तपास सुरू केला आहे. मृत आबिदविरोधात इटावा पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल होत्या.