JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दरोडेखोरांची 'मुळशी पॅटर्न' स्टाइल वरात काढणे नागपूर पोलिसांना पडले भारी, पाहा हा VIDEO

दरोडेखोरांची 'मुळशी पॅटर्न' स्टाइल वरात काढणे नागपूर पोलिसांना पडले भारी, पाहा हा VIDEO

पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागपूरकरांनी आनंद व्यक्त केला होता. रस्त्यावर जेव्हा या आरोपींची धिंड काढण्यात आली होती, ‘महाराष्ट्र पोलीस झिंदाबाद’च्या घोषणा नागपूरकरांनी दिल्या होत्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 10 ऑक्टोबर : लॉकडाउनच्या काळात शांत असलेल्या नागपूर शहरात आता पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकं वर काढले आहे. दिवसेंदिवस खून, हत्या आणि लुटमारीच्या घटना घडत आहे. अशातच एका टोळीने बारवर दरोडा टाकला होता. पण, पोलिसांना या टोळीवर कारवाई केल्यामुळे शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. नागपूरमध्ये  22 सप्टेंबर रोजी जुना जरीपटका बस स्थानक परिसरात ही घटना घडली होती.  मुख्य आरोपी आशिष प्रेम मशिया (वय 21) याने पाच ते सहा साथीदारांना घेऊन एका बारवर सशस्त्र दरोडा टाकला होता. यात पाच साथीदार हे अल्पवयीन होते. या टोळीने बारमध्ये घुसून कोयता आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बार लुटला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

\ नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासात आशिष प्रेम मशिया याच्यासह सर्व साथीरादारांना अटक केली होती. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहावी, गुन्हेगारांवर धाक राहावा, यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींची अर्धनग्न करून परिसरात धिंड काढली होती. पण, सहा जणांमध्ये पाच जण हे अल्पवयीन होते. एकीकडे पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागपूरकरांनी आनंद व्यक्त केला होता. रस्त्यावर जेव्हा या आरोपींची धिंड काढण्यात आली होती, ‘महाराष्ट्र पोलीस झिंदाबाद’च्या घोषणा नागपूरकरांनी दिल्या होत्या.  पण, या दरोडेखोर आरोपींची धिंड काढल्यामुळे पोलिसांनाच आता कारवाईला सामोरं जावं लागले आहे. नागपूरमधील बारवर सशस्त्र दरोडा घालणाऱ्या आरोपींची धिंड काढल्या प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल झाले आहे. आरोपींची धिंड काढणे हे जरीपटका पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महागात पडले आहे. कारण, सहा आरोपींपैकी पाच आरोपी हे अल्पवयीन होते. ‘शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा, मग कळेल’, पडळकरांची रोहित पवारांवर टीका त्यामुळे धिंड काढल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ व इतर पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांवर विरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 74 आणि 75 अन्वये गुन्हे दाखल नोंदविण्यात आले आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. परंतु, शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी उचलेल्या निर्णयाचे मात्र, नागपूरकरांनी स्वागत केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या