JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नांदेड : Driving test दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीला Heart Attack, जागेवरच झाला मृत्यू

नांदेड : Driving test दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीला Heart Attack, जागेवरच झाला मृत्यू

यावेळी पत्नीदेखील सोबत होती. कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पत्नीला मृत्यूबद्दल सांगताच तिला धक्का बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 10 जानेवारी : गेल्या काही दिवसात हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना वाचण्यात आल्या असतील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीत बरेच बदल होत आहे. कमी वयातच मधुमेह, रक्तदाबाची व्याधी जडत आहे. अशावेळी सर्वांनीच आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी जिममध्ये व्यायाम करीत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या सर्व घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. नांदेडमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट (Driving test) देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही बाब मन सुन्न करणारी आहे. विठ्ठल तुळशीराम काळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विठ्ठल काळे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये गेले होते. टेस्ट देत असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं. या घटनेचा त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. काळे हे आज दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत होते. तेथेच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart attack) आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे ही वाचा- नोकरीच्या शोधात लहानग्यांची भटकंती; पैशांसाठी 14 वर्षांचा मुलगा पोहोचला तेलंगणात यावेळी त्यांची पत्नीही सोबत होती. पतीचा मृत्यू झाला यावर त्यांचा विश्वास बसेना झाला. टेस्टला गेले तेव्हा चांगले होते, आणि अचानक कर्मचाऱ्यांनी पतीच्या मृत्यूची बातमी सांगितल्यामुळे पत्नीला जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या