JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / KFC फ्रँचाईजी उभारण्याचं रंगवलं स्वप्न; मात्र पुण्यातील महिलेला तब्बल 80 लाखांचा लावला चुना

KFC फ्रँचाईजी उभारण्याचं रंगवलं स्वप्न; मात्र पुण्यातील महिलेला तब्बल 80 लाखांचा लावला चुना

गेल्या काही दिवसांपासून ही महिला पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कंपनी शोधत होती.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 ऑगस्ट : प्रसिद्ध हॉटेल केएफसी हा खवय्यांचा लोकप्रिय ब्रँड आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये या केएफसीची फ्रॅंचाईजी घेण्यासाठी अनेक जण उत्सुक घ्यायला असतात. मात्र, या केएफसी ची फ्रॅंचाईजी घेताना एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना पुण्यात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - प्रसिद्ध हॉटेल केएफसीची फ्रॅंचाईजी काढून देतो असे सांगत चोरट्यांनी एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे. महिला तक्रारदार ही इस्टेट एजंट आहे. गेल्या काही दिवसांपासून ही महिला पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कंपनी शोधत होती. गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू असे नाव सांगून आरोपीची आणि त्या महिलेची ओळख झाली होती. या तिघांनी त्या महिलेला केएफसी हॉटेलची फ्रँचाईजी देतो, असे सांगितले. यानंतर सायबर चोरट्यांनी त्या महिलेला चार वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये तब्बल 79 लाख 76 हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आले. एखाद्या मोठ्या हॉटेलची फ्रेंचाईजी मिळते आहे, असे वाटल्याने त्या महिलेने त्यांना रक्कम देखील पाठवली. अशी आली घटना समोर - कंपनीचे खोटे कागदपत्र तयार करण्यात होते. तसेच त्या महिलेला आपल्यावर विश्वास बसावा, यासाठी त्या महिलेला ते पाठवले होते. इतकेच नव्हे तर केएफसीची खोटी वेबसाईट देखील बनवली होती. त्यांनी सांगितल्यानुसार त्या महिलेने त्यांना पैसे पाठवले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. हेही वाचा -  रात्रीच्या स्वप्नांनी बारामतीच्या अक्षयचा घेतला जीव; कुटुंबीयांनी सकाळी दार उघडलं अन् हादरलेच!   यानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरुन पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या