JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 5 वर्षांच्या सुखी संसार एका वादाने संपला, पतीच्या आत्महत्येनंतर 6 दिवसांनी पत्नीने घेतला गळफास

5 वर्षांच्या सुखी संसार एका वादाने संपला, पतीच्या आत्महत्येनंतर 6 दिवसांनी पत्नीने घेतला गळफास

नातेवाईकांना वाटलं दोघेही जण औरंगाबादला गेले असतील, मात्र दोघेही जण हिंगोली जिल्ह्यातील भुवनेश्वर येथे उतरले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 18 नोव्हेंबर : दिवाळीच्या निमित्ताने  गावी आलेल्या एका प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने एकापाठोपाठ आत्महत्या (committed suicide) केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आधी पतीने विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली. तर त्यानंतर आज पत्नीनेही गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. सुभाष बोरकर आणि प्रमिला बोरकर असं या जोडप्याचं नाव आहे. 5 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघेही औरंगाबाद शहरात वास्तव्यास होते. या दोघांना दोन मुलं आहेत. दिवाळीच्या निमित्ताने दोघेही जण आपल्या मुलांसह नांदेड जिल्ह्यातील हदगावाकडे आले होते. मात्र, 10 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही जण गावातून निघून गेले. अभिनेत्री आणि भाजप नेत्या कार अपघातातून थोडक्यात बचावल्या, घातपाताचा संशय नातेवाईकांना वाटलं दोघेही जण औरंगाबादला गेले असतील, मात्र दोघेही जण हिंगोली जिल्ह्यातील भुवनेश्वर येथे उतरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला सुभाषने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. सुभाषच्या मृत्यूनंतर पत्नी प्रमिला बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोधाशोध घेतला पण कुठेही तिचा पत्ता लागला नाही. अखेर 17 नोव्हेंबर रोजी ज्या परिसरात सुभाषने विष प्राशन करून आत्महत्या केली, त्याच भुवनेश्वर परिसरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रमिलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पतीला बेडरूममध्ये लॉक करून 7व्या मजल्यावरून पत्नीनं मारली उडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रमिलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.   पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ही घटना घडली असावी, असा संशय वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या