पानीपत, 9 जानेवारी: व्यापाऱ्यासोबत (Businessman) बंद खोलील (Closed room) मद्यपान (Liquor) केल्यावर दोन महिलांनी (Two women) त्याला मारहाण (Beating) करत लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीटिंगच्या (Meeting) बहाण्यानं व्यापाऱ्याची भेट घेऊन महिलांनी चर्चा सुरू केली होती. हॉटेलमधील एक रुम बुक करून चर्चा करता करताच जेवण आणि दारुचे पेगही मागवण्यात आले होते. व्यापाऱ्याला दारूची नशा चढल्याचा गैरफायदा घेत दोन महिलांनी त्याच्यावर हल्ला करत त्याच्याकडचे पैसे आणि दागिने लुटून नेल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्यासोबत हॉटेल रुममध्ये महिला हरियाणातील पानीपतमध्ये 5 जानेवारीला एका व्यापाऱ्यानं हॉटेलमधील रुम बुक केली होती. त्याला भेटायला सूट, बूट आणि जीन्समधील दोन महिला आल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत ही मीटिंग चालले, असं हॉटेल व्यवस्थापनाला सांगण्यात आलं होतं. महिला दाखल झाल्यानंतर काही वेळानंतर त्या तिघांनी हॉटेलमध्येच दारुची पार्टी सुरू केली. दारुची बाटली मागवून चर्चा करता करता एकामागून एक पेग रिचवायला सुरुवात झाली.
व्यापाऱ्याला चढली नशा दारुचे काही पेग पोटात गेल्यानंतर व्यापाऱ्याला नशा चढायला सुरुवात झाली. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटायला लागलं आणि तोल जाऊ लागला. व्यापाऱ्याची प्रतिकार करण्याची ताकद कमी झाल्याचं हेरत महिलांनी त्याच्यावर हल्लाबोल करत त्याच्याकडे असणारे 50 हजार रुपये लुटले. व्यापाऱ्याने जेव्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जड वस्तू आपल्या डोक्यात मारण्यात आल्याचं व्यापाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आपल्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलो आणि आपण बेशुद्ध पडलो, असं व्यापाऱ्यानं पोलिसांना सांगितलं आहे. महिलांनी त्याच्या गळ्यातील सुमारे 7 ते 8 तोळे सोन्याची चेनही पळवून नेल्याचं सांगितलं जात आहे. महिला हॉटेलच्या रुममधून लगबगीनं बाहेर पडत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे वाचा -
पोलीस तपास सुरू पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या महिलांचा शोध सुरू केला आहे. अशा प्रकारे व्यापाऱ्यांशी गोड बोलून मीटिंग सेट करणारी आणि नंतर व्यापाऱ्याला लुटणारी एखादी गँग सक्रीय आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.