JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / देशातील कोरोना स्थितीबाबत दिलासायादायक बातमी, जागतिक आरोग्य संघटनेनं दिली Good News

देशातील कोरोना स्थितीबाबत दिलासायादायक बातमी, जागतिक आरोग्य संघटनेनं दिली Good News

भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटच्या (Corona Variant) धोक्याबाबत एक गूड न्यूज समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबतची माहिती दिली आहे.

जाहिरात

त्यामुळे फुकेत सारख्या बेटांवर सर्वातआधी बेटावरील 70% जनतेला व्हॅक्सिनेशन करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्यानंतर हा प्रदेश पर्यटकांसाठी देखील खुला होणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 02 जून : भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटच्या (Corona Variant) धोक्याबाबत एक गूड न्यूज समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारतात सर्वात आधी आढळून आलेल्या कोरोना व्हेरियंट म्हणजेच डेल्टा व्हेरियंटचा केवळ एक स्ट्रेन चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. इतर दोन स्ट्रेन अधिक घातक नसल्याचं संघटनेनं सांगितलं आहे. कोरोनाच्या या व्हेरियंटला B.1.617 या नावानं ओळखलं जातं. याच व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार इतका भयंकर झाल्याचं पाहायला मिळालं. हा ट्रिपल म्यूटेंट व्हेरियंट आहे, कारण याच्या तीन प्रजाती आहेत. मागील महिन्यातच WHO नं कोरोनाचा हा व्हेरियंट ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ म्हणजेच चिंता वाढवणारा व्हेरियंट असल्याचं म्हटलं होतं. यावर भारत सरकारनं आक्षेप घेतला होता. मात्र, आरोग्य संघटनेनं मंगळवारी असं म्हटलं, की आता B.1.617 व्हेरियंटमधील केवळ एकच प्रजाती चिंतेचा विषय आहे. संघटनेच्या मते, B.1.617.2 व्हेरियंटचा धोका कायम आहे, तर इतर दोन व्हेरियंटचा धोका कमी झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला जबर मारहाण, VIDEO VIRAL होताच CM अ‍ॅक्शन मोडमध्ये कोरोनाचा B.1.617.2 व्हेरियंट अजूनही चिंतेचा विषय आहे. याशिवाय विषाणूचे इतर तीन व्हेरियंटही मूळ संक्रमणाच्या तुलनेत अधिक घातक मानले जात आहेत. कारण ते अधिक वेगानं पसरणारे आणि घातक आहेत. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात पहिल्यांदा आढळलेल्या बी.1.617.1 आणि बी.1.617.2 ला क्रमशः ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ अशी नावं दिली आहेत. तीन आठवड्यांआधी काही माध्यमांनी बी.1.617 या कोरोना व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट असं म्हटलं होतं. यावर भारत सरकारनं आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीर जागतिक आरोग्य संघटनेनं व्हेरियंटला देशाच्या नावानं न संबोधता संघटनेकडून दिलेल्या नावांनुसार त्याचा उच्चार करण्यास सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या