वॉशिंग्टन, 01 मे : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) लस (vaccine) तयार, लवकरच कोरोनाविरोधातील लस येणार, कोरोनाविरोधातील लसीची चाचणी यशस्वी, कोरोनाविरोधातील लसींचं ट्रायल अशा कित्येक बातम्या गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. आता प्रश्न आहे मग नेमकी ही कोरोनाव्हायरसविरोधातील लस उपलब्ध होणार कधी? न्यूयॉर्क टाइम्स ने याबाबत रिपोर्ट दिला आहे. अमेरिकेतील कोरोनाव्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. फॉकी यांनी सांगितलं की, “या महासाथीची लस येण्यासाठी 12 ते 18 महिने लागतील” हे वाचा - Lockdown संपल्यानंर अशी असेल केंद्राची योजना, मोदींनी मंत्र्यांसोबत केली चर्चा मात्र एनवायटीच्या रिपोर्टने म्हटलं आहे की, क्लिनिकल ट्रायल खूप कमी यशस्वी होतात, त्यात हा व्हायरस आपल्यासाठी एकदम नवा आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर नव्या आजारावर लस तयार होण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष लागली आहेत. कोरोनाव्हायरसचा स्वभाव, स्वरूप आणि क्रिया समजून घेण्यात आल्या, तरीही शास्त्रज्ञांना आपल्या स्टडी आणि त्याच्या पडताळणीसाठीच वर्ष जातं आणि त्यानंतर मंजुरी मिळण्यात आणखी जास्त वेळ लागतो. सध्या आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे आता कमी वेळ लागण्याची आशा केली जाऊ शकते. काय असते लसीची प्रक्रिया? लस तयार होण्यात वर्षांपासून दशकापेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो. लस विकसित केली जाते. त्यानंतर त्याच्या ट्रायलसाठी आवश्यक डोस उत्पादित करावे लागतात. सुरुवातीला कमी लोकांवर टेस्ट केली त्यानंतर शेकडो लोकांवर दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट आणि मग काही हजारों लोकांवर तिसऱ्या टप्प्यातील टेस्ट केली जाते. या प्रक्रियेनंतर सकारात्मक परिणाम आल्यानंतरच लसीच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते. तंत्रज्ञानावरही प्रश्नचिन्ह आता कोरोनाव्हायरसच्या ज्या लसींवर काम केलं जातं आहे, त्यापैकी बहुतेक एमआरएनएसारख्या तंत्रज्ञानावर बनत आहेत आणि तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानावरील कोणतीही लस आतापर्यंत प्रभावी ठरली नाही. मात्र ही लस प्रभावी ठरेल अशी आशा फार्मा कंपन्यांना आहे. लसीला मंजुरी जगभरात कोविड -19 विरोधात कित्येक लसींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. बहुतेक लसी आरएनए आणि डीएनए तंत्रज्ञानावर तयार करण्यात आल्यात. मात्र जितक्या क्लिनिकिल ट्रायल्स होतात त्यापैकी 10 टक्क्यांनाच मंजुरी मिळते, हे शास्त्रज्ञांनाही माहिती आहे. बाकी काही ना काही कारणामुळे फेल होतात. लसीचं उत्पादन मंजुरी मिळाल्यानंतरही लसीचं उत्पादन ही मोठी प्रक्रिया आहे. कारण लाखो, कोट्यवधी डोसची निर्मिती करण्याची आणि त्यांच्या तपसणीसाठी लागणारा कालावधी कमी नसतो. एकिकडे बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने वेळ वाया जाऊ नये, यासाठी फाऊंडेशन एकत्र 7 वेगवेगळ्या लसींसाठी फॅक्ट्री तयार करेल असं म्हटलं आहे. जेणेकरून उत्पादनानंतर एखादी लस रद्द करावी लागली तरी इतर काम सुरू राहिल. हे वाचा - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Work From Home, घरात स्ट्रेस इटिंगपासूनही बचाव करा तर दुसरीकडे मर्कमधील वॅक्सिन उत्पादनाचे माजी प्रमुख विजय सामंत यांच्या हवाल्यानुसार सांगण्यात आलं की, लसीचं उत्पादन विशेषत: सध्याच्या परिस्थितीत खूप कठीण काम आहे. अमेरिकेत फक्त 2 ते 3 लसींच्या मास प्रोडक्शनची क्षमता आहे आणि अशा एखाद्या देशानं लस तयार केली तरी तो सुरुवातीला आपल्या देशात आणि त्यानंतर जगाला पुरवठा करतो. ब्युरोक्रेसीचे चक्कर लस तयार झाली, त्याचं उत्पादनही झालं तरीही क्रॉस चेकिंग करून त्याला मंजुरी मिळण्यापर्यंत खूप वेळ म्हणजे जवळपास एक वर्षही लागू शकतं. मग लस लवकर येण्याचे दावे का केले जात आहेत? जर लसीची प्रक्रिया इतकी किचकट आहे तर मग शास्त्रज्ञ, संस्था लस 12 ते 18 महिन्यांत येईल, असा दावा का करत आहेत. अमेरिकेतल्या एका मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. हॉटेज यांनी सांगितल, “बायोटेक कंपन्या लसीबाबत घोषणा करतात कारण ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे, त्यांना याबाबत माहिती मिळेल आणि त्यांच्या आशा कायम राहतील” लस प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल? एचआयव्ही लसीच्या कामाला 40 वर्ष उलटूनही सध्या काय परिस्थिती आहे, ते समजून घ्यायला हवं. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल खूप धोकादायक ठरल्या आणि यश फक्त 30 टक्केच होतं. आता सांगितलं जातं आहे की एचआयव्हीविरोधातील लस 2030 पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून 50 वर्षांनंतर येईल. हे वाचा - अखेर सरकार सोडणार अडकलेल्यांसाठी स्पेशल ट्रेन; काय आहे आदेश मात्र कोरोनाव्हायरसबाबत असं न झालेलं चांगलं आणि तज्ज्ञांच्या मते, या व्हायरसबाबत तसं होणार नाही. लस नसतानाही एचआयव्हीविरोधात बरेच मार्ग आहेत. औषधं आणि थेरेपीच्या आधारे तुम्ही जगू शकता, अशी परिस्थिती विज्ञान तयार करतं. म्हणजे आव्हानं खूप आहेत आणि अशात जर यावर्षी किंवा पुढच्या वर्षी प्रभावी लस तयार झाली तर ती एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. रिपोर्टनुसार जगभरात कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी कमीत कमी 254 थेरेपी आणि 95 लसींवर आधीच काम सुरू झालं आहे. डॉ. हॉटेज यांच्या हवालानुसार, “जरी 18 महिन्यांचा कालावधी निश्चित केला तरी हे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला भरपूर सक्षम घोडे एकत्र उतरवावे लागतील” येल युनिव्हर्सिटीचे इम्युनोबायोलॉजिस्ट अकीको इवासाकी म्हणाले, “जर आपण अशा पद्धतीनं लस तयार केली तर कोरोनाव्हायरसविरोधातील लस 18 महिन्यांत बाजारात येणं शक्य नाही. त्यामुळे अशा मर्यादित कालावधीत शॉर्टकट मार्गाने लसीवर काम करावं लागेल” संकलन, संपादन - प्रिया लाड