मुंबई, 29 एप्रिल : 100 वर्षांपूर्वी 1918 ते 1919 दरम्यान पहिल्या महायुद्धात (first world war) जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्पॅनिश फ्लूच्या (spanish flu) रुपात जागतिक महासाथीचं संकट आलं. त्यावेळी कमीत कमी 5 कोटी आणि जास्तीत जास्त 10 कोटी लोकांचा जीव गेला. फक्त भारतात 1.4 कोटी मृत्यू झाले होते. याचा अर्थ एका युद्धापेक्षाही जास्त तयारी महासाथींची लढण्यासाठी करायला हवी. हा स्पॅनिश फ्लू आता एच1एन1 इन्फ्लुएंजा म्हणजे स्वाइन फ्लू म्हणून ओळखला जातो. पुन्हा पुन्हा येतो शत्रू स्पॅनिश फ्लूनं दाखवून दिलं की जागतिक महासाथ नावाच्या शत्रूचा खात्मा एकाच वेळी नाही होऊ शकत. तो पुन्हा पुन्हा येतो. 1918 साली वसंत ऋतूत स्पॅनिश फ्लूला सुरुवात झाली, सप्टेंबरमध्ये त्या प्रकोप संपेल असं वाटलं तोपर्यंत त्याचा दुसरा आणि सर्वात धोकादायक स्टेज सुरू झाली. पुन्हा एकदा आशा निर्माण झाली होती की फेब्रुवारी 2019 मध्ये या महासाथीचा तिसरी लहर दिसून आली. काही देशांमध्ये 1920 मध्ये या महासाथीची चौथी लाटही पाहायला मिळाली. सध्या कोविड-19 महासाथीचे चीनसहित कित्येक देशांनी 3 चरण पाहिलेत. बहुतेक लोकसंख्या संक्रमित होण्याची गरज जशी आता कोरोनाव्हायरसवर कोणते उपचार नाही, ना लस तशीच परिस्थिती 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूबाबत होती. त्यामुळे हा आजार झपाट्याने पसरत गेला. हा आजार तोपर्यंत पसरत होता जोपर्यंत त्याच्याविरोधात सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली नव्हती. याचा अर्थ बहुतेक लोकसंख्या संक्रमित होऊन बरी झाली तर या व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता विकसित होईल आणि त्याचा फायदा इतर लोकसंख्येला होईल. हे वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण कायम; दिल्लीनंतर मुंबईतही प्लाझ्मा थेरेपी यशस्वी सध्या काही वैद्यकीय तज्ज्ञांनीही भारतात कोविड-19 चा नाश करण्यासाठी सामूहिक इम्युनिटीपर्यंत पोहोचायला हवं, असं म्हटलं आहे. न्युमोनिया जीवघेणा स्पॅनिश फ्लूची मुख्य लक्षणं न्युमोनियासारखीच होती, जी जीवघेणी ठरली. 1918 सारखीच परिस्थिती 2020 मध्येही आहे. कारण कोविड-19 च्या कित्येक रुग्णांमध्ये न्युमोनियासारखी लक्षणं दिसली आणि गुंतागुंतीमुळे कित्येकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनाव्हायरसमुळे होणारा मृत्यूदर स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी आहे. वेगळ्या व्हायरसचं वेगळं लक्ष्य स्पॅनिश फ्लू आणि कोरोनाव्हायरसमध्ये काही प्रमाणात समानता असली तरी वेगळेपणाही आहे. वेगवेगळे व्हायरस वेगवेगळ्या लोकांना आपले शिकार बनवत असता. स्पॅनिश फ्लूने तरुण आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असलेल्या लोकांनाही आपल्या विळख्यात घेतलं होतं, तरुणांंपासून वयस्करापर्यंत सर्व जण मोठ्या संख्येनं संक्रमित झाले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र काही रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरस हा वयस्कर आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना आपल्या विळख्यात लवकर घेतो. आरोग्य सुरक्षा गरजेची प्रति एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयात किती बेड आहेत? अमेरिकेत 1960 च्या दशकात 9 बेड होते मात्र 2017 मध्ये 3 पेक्षाही कमी बेड आहेत. भारतासारख्या विकसनशील देशातही निम्म्याहून अधिक बेड्स उपलब्ध असल्याचा आकडा आहे. 1918 साली यापेक्षा चांगली परिस्थिती होती. हे वाचा - कोरोनावर लस शोधणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये ‘ही’ भारतीय शास्त्रज्ञ रिपोर्ट्सनुसार त्यावेळी डॉक्टरांची संख्या कमी होती, मात्र आजच्या तुलनेत बेड्स कमी नव्हते. सध्याची परिस्थिती पाहता आरोग्य सुरक्षेबाबत सर्वच देश म्हणजे संपूर्ण जग पिछाडीवर आहेत. प्राथमिकता अर्थव्यवस्था नाही आरोग्य हवं 1918 साली सर्वात भयंकर महासाथीवेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, क्वारंटाइन आणि मूलभूत स्वच्छतेच्या सवयी या सोबत अमेरिकेसह कित्येक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं. त्यानंतर तात्काळ अर्थव्यवस्थेला नुकसान झाल्याचं दिसलं. मात्र ज्या शहरांमध्ये प्रतिबंध होता, तिथं मीडियम टर्ममध्ये अर्थव्यवस्थेवर कोणताही दुष्परिणाम नाही तर उलट महासाथीनंतर आर्थिक गती तुलनेनं वाढल्याचं दिसलं. सध्या अमेरिका आणि युरोपसारखे देश महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला होणाऱ्या नुकसानाचा विचार करत आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड