JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / New Normal: याठिकाणी क्वारंटाइन, आयसोलेशन रद्द! तापाप्रमाणेच कोरोनाशी देणार लढा

New Normal: याठिकाणी क्वारंटाइन, आयसोलेशन रद्द! तापाप्रमाणेच कोरोनाशी देणार लढा

सिंगापूरमध्ये फ्लूसारख्या (Flu) सर्वसामान्य आजारांचा सामना जसा सहजपणे केला जातो, तशीच पावलं आता कोरोनाविरोधात उचलली जाणार आहेत. ‘झिरो ट्रान्समिशन’ म्हणजे शून्य संसर्ग असं उद्दिष्ट आता सिंगापूरमध्ये नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

26 जून: जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाने कहर केला आहे. सिंगापूर (Singapore) हा देश देखील याला अपवाद नाही. कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर करणं, लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर करणं, नागरिकांसाठी क्वारंटाइन (Quarantine) आणि आयसोलेशनचे निकष आदी नियमांची अंमलबजावणी अनेक देशांमध्ये केली जात आहे. सिंगापूरने आता यात लवकरच बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फ्लूसारख्या (Flu) सर्वसामान्य आजारांचा सामना जसा सहजपणे केला जातो, तशीच पावलं आता कोरोनाविरोधात उचलली जाणार आहेत. ‘झिरो ट्रान्समिशन’ म्हणजे शून्य संसर्ग असं उद्दिष्ट आता सिंगापूरमध्ये नसेल. सिंगापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी असलेला क्वारंटाइनचा नियम आता रद्द करण्यात येणार आहे. तसंच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही आता क्वारंटाइन होण्याची गरज पडणार नाही. दररोज कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या जाहीर करणं किंवा त्याबाबत माहिती देणं बंद केलं जाणार आहे. परंतु, नागरिकांना दुकानांमध्ये किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी टेस्ट करावी लागू शकते. हे वाचा- धक्कादायक! 20हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान सिंगापूरच्या वरिष्ठ मंत्र्यांनी कोरोनासोबत जगण्यासाठी हे न्यू नॉर्मल (New Normal) असेल, असं म्हटलं आहे. सिंगापूरचे उद्योगमंत्री गाम किम योंग, अर्थमंत्री लॉरेन्स वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी या आठवड्यात स्ट्रेटस टाइम्स वृत्तपत्रात लिहिलेल्या संपादकीय लेखात असं म्हटलं आहे, की कोरोना एवढ्यात जाणार नाही, ही वाईट बातमी आहे. परंतु, त्याच्यासह सर्वसामान्य पद्धतीने जगता येऊ शकतं ही चांगली बातमी म्हणता येईल. कोरोनासोबत जगणं शिकावं लागेल मंत्री कुंग, वोंग आणि योंग यांच्याकडून एक आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार क्वारंटाइन, कोविड टेस्ट याबद्दलच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे तिघे सिंगापूरमधल्या कोविड-19 मल्टी-मिनिस्ट्री टास्क फोर्सचे सदस्य आहेत. या तीनही नेत्यांनी सांगितलं, की दर वर्षी अनेक लोकांना फ्लू होतो. त्यापैकी बरेच जण रुग्णालयात दाखल न होता बरे होतात. फार कमी लोकांना विशेष वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्यापैकी अत्यल्प लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असते. कारण त्यांना पूर्वीपासून अन्य आजार झालेले असतात. तसंच कोरोनाचं आहे. आपण कोरोना नष्ट करू शकत नाही. परंतु, आपण एन्फ्लुएन्झा (Influenza) किंवा चिकनपॉक्स (Chicken pox) यांसारख्या कमी धोकादायक आजारांमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. त्यानंतर या आजारासोबत जगणं शिकू शकतो. हे वाचा- कोरोना महासाथीत लहान मुलांची चिंता नको; सिरम इन्स्टिट्यूटने दिली GOOD NEWS! दररोज 20 ते 30 रुग्ण अन्य देशांप्रमाणे सिंगापूरमध्ये गेल्यावर्षी सुरुवातीला कोविड-19चा (Covid-19) संसर्ग जास्त प्रमाणात दिसून आला. एप्रिल महिन्याच्या मध्यात दररोज 600पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळत होते. ऑगस्टमधल्या छोट्या लाटेनंतर येथे कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. 57 लाख लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये सध्या दररोज 20 ते 30 रुग्ण सापडत आहेत. या देशात आतापर्यंत 35 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. अन्य देशांप्रमाणे सिंगापुरातही सीमेवर कठोर निर्बंध लागू आहेत. या देशात गेल्यानंतर कोविड टेस्ट, हॉटेल क्वारंटाइन आणि घरातच विलगीकरणात राहणं आदी नियम लागू आहेत. परंतु, हे नियम न्यू नॉर्मल अंतर्गत पूर्णतः शिथिल करण्याचं नियोजन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या