भोपाळ, 15 एप्रिल : कोरोनामुळं कुटुंबातील (Death due to Corona) सदस्य गमावल्यानं देशात रोज कित्येक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळतोय. मात्र नेतेमंडळींना मात्र जणू याचं भानंच नाही, अशी वक्तव्ये नेते करत असल्याचं पाहायला मिळतंय. असंच एक धक्कादायक वक्तव्य केलंय मध्यप्रदेशचे पशुपालन मंत्री प्रेमपालसिंह पटेल (MP Minister Prem Singh Patel) यांनी केलंय. ‘ज्यांचं वय होतं, त्यांना मरावंही लागतंच’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 14 एप्रिल रोजी मध्यप्रदेशच्या बडवानी याठिकाणी पटेल हे आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांसमोर अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमपालसिंह पटेल म्हणाले की, ‘हे मृत्यू कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक जण कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य मागत आहेत. तुम्ही म्हणता की, रोज अनेक लोक मरत आहेत. ज्यांचे वय होते, त्यांना मरावंही लागतंच’. एएनआय या वृत्तसंस्थेनं पटेल यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
(हे वाचा - ‘शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या!’ नाना पटोलेंची मागणी ) एवंढच नाही तर कोरोनाच्या आकडेवारीबाबतही त्यांनी एक गंभीर वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी त्यांना सरकार मृत्यूचे आकडे लपवत असल्याबाबत प्रश्न केला होता. त्यावर पटेल म्हणाले की, लोकं देखील लपवत आहेत. लोकांना कुणालाही याबाबत सांगायचे नसते. त्यामुळं ज्याचा मृत्यू झाला त्याला ते गुपचूप घेऊन जातात. मग सरकार आकडे कसे सांगणार? असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. (हे वाचा - कोरोना रुग्णांना काहीसा दिलासा, औषध कंपन्यांनी Remdesivir चे उत्पादन वाढवले ) ‘डॉक्टरांना मारायचे का?’ डॉक्टरांच्या कमतरतेबाबतच्या प्रश्नावर उत्तर देतानाही मंत्रिमहोदयांनी काहीसं असंच उत्तर दिलं. एवढं मोठं राज्य आहे तर सगळीकडंच व्यवस्था करावी लागते. काही ठिकाणी डॉक्टर असूनही ते या स्थितीत काम करू इच्छित नाहीत. मग त्यांना काय मारायचे का? असं पटेल म्हणाले. मध्य प्रदेशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. रोज कोरोनाग्रस्तांचा आकडा चार हजारांपेक्षा अधिक वाढत आहे. अधिकारीदेखिल कोरोनाच्या विळाख्यात अडकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने नागरिकांसमोर जाण्याची गरज आहे. मात्र अशाप्रकारची वक्तव्ये या गंभीर काळात सरकारच्या अडचणी अधिक वाढवणारी ठरत आहेत.