JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / ​ पुणे जिल्ह्यात कोरोना सुपर स्प्रेडर्सचा शोध सुरू; राजकीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांचीही केली चाचणी

​ पुणे जिल्ह्यात कोरोना सुपर स्प्रेडर्सचा शोध सुरू; राजकीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांचीही केली चाचणी

‘पॉझिटिव्ह सापडलेल्यापैकी बहुतांश जण असिम्प्टमॅटिक (Asyptomatic) आहेत, अर्थात त्यांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 21 मार्च : कोरोनाची दुसरी लाट (Corona) आल्यासारखं चित्र देशात अनेक ठिकाणी दिसत असून, त्यात महाराष्ट्र (Maharashtra) सर्वांत आघाडीवर आहे. दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले असतात, असं चित्र गेले काही दिवस सातत्याने दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होणारी सर्वाधिक वाढ मुंबई (Mumbai), पुणे (Pune) या प्रमुख शहरांसह विदर्भातील काही शहरांमध्ये दिसून येते आहे. पुन्हा निर्बंध लादण्यात आलेले असले, तरी पुन्हा लॉकडाउन (Lockdown) परवडण्यासारखं नसल्याने सर्वांचाच त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर, रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. पुणे जिल्हा परिषदेने सुपर स्प्रेडर्स (Super Spreaders) अर्थात लोकांशी सर्वाधिक संपर्क येणाऱ्या आणि त्यामुळे कोरोना पसरवण्यात सर्वाधिक हातभार असणाऱ्या व्यक्ती शोधून त्यांच्या कोरोना टेस्ट (Corona Test) करायचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुणे जिल्हा परिषदेने असे दीड लाख सुपर स्प्रेडर्स निश्चित केले असून, त्यापैकी 500 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सुपर स्प्रेडर्स म्हणजे अशा व्यक्ती, की ज्यांचा समाजातला वावर सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असतो, अशी व्याख्या करण्यात आली आहे. राजकीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आदींचा त्यात समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी सांगितलं, ‘अशा व्यक्ती ओळखून, त्यांच्यापैकी काही जणांची चाचणी करण्यात आली. त्यात 500 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. अशा व्यक्तींना विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अशा व्यक्तींना वेळीच वेगळं केलं नाही आणि त्यांच्यावर उपचार केले नाहीत, तर त्यांच्या मार्फत कोरोना विषाणू जनतेत पसरू शकतो.’ हे ही वाचा- मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? कोरोना रुग्णसंख्येने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ‘पॉझिटिव्ह सापडलेल्यापैकी बहुतांश जण असिम्प्टमॅटिक (Asyptomatic) आहेत, अर्थात त्यांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशा प्रकारे निश्चित उद्दिष्ट ठेवून कोरोना चाचण्या केल्या जात असल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागांमध्ये कोरोना प्रसाराचा वेग निदान कमी करण्यात यश आलं आहे,’ असं प्रसाद यांनी सांगितलं. ‘ज्या तालुक्यांच्या जवळ शहरं आहेत किंवा जे तालुके शहरी आहेत, तिथे रुग्णसंख्येत जास्त वाढ होत असल्याचं दिसत आहे. कारण तिथे लोकांचं फिरण्याचं प्रमाण जास्त आहे,’ असं प्रसाद यांनी सांगितलं. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत खूप वाढ होत होती, तेव्हा त्याच्या प्रसाराचं कारण या सुपर स्प्रेडर व्यक्ती असल्याचा मुद्दा लक्षात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही महापालिकांनी अशा व्यक्तींच्या रोगप्रसारातल्या भूमिकेबद्दल मत मांडलं होतं. त्याच अनुषंगाने आताही सुपर स्प्रेडर्स शोधून त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. कोविड-19च्या रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. सध्या केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील को-मॉर्बिडिटीज असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. सर्वांनाच लसीकरण खुलं केलं जावं, असा मुद्दा खासदार, तसंच उद्योगजगतातल्या नेत्यांनी मांडला आहे. व्यापाऱ्यांसारख्या व्यक्तींचा थेट लोकांशी संपर्क येत असल्याने अशा व्यक्तींनाही लसीकरणात सामावून घेण्याची मागणी होत आहे. सध्या लसीकरण केंद्र सरकारच्या कार्यक्रमानुसार होत आहे. जिल्हा परिषद ही केवळ अंमलबजावणी करणारी यंत्रणा असल्याने ती आदेशानुसार काम करत आहे, असं प्रसाद यांनी नमूद केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या