JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / पुन्हा Bhilwara Model ची चर्चा! मोठ्या शहरांना जमलं नाही ते या छोट्या शहरात घडलं; 4 महिन्यांपूर्वीच उभारला ऑक्सिजन प्लांट

पुन्हा Bhilwara Model ची चर्चा! मोठ्या शहरांना जमलं नाही ते या छोट्या शहरात घडलं; 4 महिन्यांपूर्वीच उभारला ऑक्सिजन प्लांट

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हेच भीलवाडा कंटेन्मेंट मॉडेल (bhilwara Containment Model) म्हणून खूप चर्चेत होतं. येथील जिल्हा रुग्णालय कोरोना काळातील व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

जाहिरात

ऑक्सिजनचा तुटवडा होणार कमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भीलवाडा (राजस्थान), 30 एप्रिल : सध्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. औषधं, बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यातच दैनंदिन रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी, प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण वाढला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर पुरेशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या स्थितीत काही रुग्णालयांनी योग्य नियोजन केल्याने रुग्णांना काहीसा दिलासा मिळत आहे. यात सर्वाधिक चर्चेत आहे ते राजस्थानमधील (Rajasthan) भीलवाडा (Bhilwara). येथील जिल्हा रुग्णालय कोरोना काळातील व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राजस्थानमधील भीलवाडा येथील कंटेन्मेंट मॉडेल (Contenment Model) खूप चर्चेत होतं. हेच भीलवाडा आता तेथील नियोजनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एकीकडे देशात ऑक्सिजन कमतरतेमुळे हाहाकार उडाला असताना येथील 8 रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा मात्र सुरळीत सुरु आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येही आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवत आहे. 10 दिवसात 2 वेळा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, लग्नाच्या पूर्वसंध्येला मृत्यूने गाठलं इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,भीलवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात (Mahatma Gandhi District Hospital) 430 बेडस आहेत. यापैकी 300 बेडस केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी आहेत. सध्या या रुग्णालयात बेड्सची कमतरता असली तर ऑक्सिजन पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरुण गौर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, राजस्थान सरकारने अगदी वेळेवर काही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले. आम्ही सरकारला 4 महिन्यांपूर्वी आगामी काळातील धोके आणि तुटवडा यांची कल्पना दिल्यावर सरकारने तातडीने या रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट उभारला. डॉ. गौर म्हणाले की, सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष देत तातडीने सुविधा उभारल्या. हेच एकमेव कारण आहे की अन्य राज्यांच्या तुलनेत राजस्थान अद्यापही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करीत आहे. आमच्या या ऑक्सिजन प्लांटमध्ये (Oxygen Plant)दररोज 100 सिलिंडर उत्पादन होते. तसंच राज्यातील अन्य प्लांटमधूनही ऑक्सिजन पुरवठा होतो. त्यामुळे रुग्णांकरिता आवश्यक ऑक्सिजनचा पुरेसा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. यापूर्वी महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा 30 ते 40 सिलिंडर होता. आता आम्हाला 400 ते 500 सिलिंडरची गरज भासत आहे. त्यापैकी 100 सिलेंडर आमच्या प्लांटमधून उपलब्ध होतात. ऑक्सिजन पुरवठ्या व्यतरिक्त हे रुग्णालय रुग्णांकरिता पुरेशा प्रमाणात बेडसची (Beds)व्यवस्था सातत्याने करीत आहे. बेडस कमी पडू नये म्हणून रुग्णालयाच्या आवारातही बेडसच्या व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. भीलवाडात गेल्या 24 तासांत 535 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या