वॉशिंग्टन, 15 जुलै : कोरोना (Coronavirus ) सारख्या अदृश्य शत्रूशी गेले पाच महिने सारे जग सामना करत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनानं आपलं शिकार केलं आहे. मात्र कोरोनावर लस (Coronavirus Vaccine) शोधण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही आहे. वॉशिंग्टनमधून एक चांगली बातमी आली आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्ना (Moderna) कोरोनाव्हायरस लसने पहिली चाचणी यशस्वी पार केली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या लसीने प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅंटिबॉडिज तयार केली आहेत. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या लसीचे कोणतेही साइड इफेक्ट दिसून आलेले नाही आहेत. एखाद्या लसीनं सुरुवातीच्या काळातच जर अॅंटिबॉडिज तयार केली तर त्याला मोठे यश मानले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की ही लस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या पहिल्या चाचणीत अशा 45 लोकांचा समावेश होता जे निरोगी होते आणि त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान होते. वाचा- …म्हणून कोरोनावर यशस्वी उपचार करणारी रशियन लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही लेट स्टेज ट्रायलची तयारी या चाचणी दरम्यान वृद्धांवरही लसची चाचणी घेण्यात आली, ज्यांचे निकाल अद्याप कळलेले नाहीत. दिग्गज औषध निर्माता मॉडर्ना आता कोरोना विषाणूच्या लसीच्या लेट स्टेज ट्रायलची तयारी करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 27 जुलैच्या सुमारास ट्रायलला सुरुवात होईल. मोडेर्ना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 87 जागांवर या लसीची चाचणी घेईल. असा विश्वास आहे की चाचणीचा तिसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर कंपनी मोठी घोषणा करू शकते. वाचा- कोरोनाला हरवून देश कसा जिंकणार? वाचा 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी सर्वात जास्त कोरोना प्रभावित क्षेत्रात होणार ट्रायल राजधानी वॉशिंग्टन डी.सी. सोडून देशातील इतर 30 राज्यात या लसीचे ट्रायल होणार आहे. लसीच्या चाचण्यांसाठी निवडलेल्या अर्ध्याहून अधिक जागा टेक्सास, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया, अॅरिझोना आणि उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना येथे आहेत. या भागांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. या लसीची पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या घेण्यात कंपनी यशस्वी झाल्याचा दावा केला. वाचा- कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करणं बंधनकारक करा; IMA ची सरकारला सूचना