वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.
पुणे, 22 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यातच एका दहा वर्षांच्या मुलाचे आतडे कोरोनामुळे सडल्याची दुर्मीळ समस्या समोर आली आहे. या दहा वर्षांच्या मुलाचे आतडे सडल्यामुळे त्याची अवस्था गंभीर होती, अखेर त्याच्या वडिलांनी त्यांचे 200 सेंटीमीटर लहान आतडे मुलांत ट्रान्सप्लॅंट केले. ओम घुले (10) असे या मुलाचे नाव असून, त्याच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल उपचार सुरू होते. येथील डॉक्टरांनी असा दावा केला आहे की कोव्हिड-19मुळे छोटे आतडे ट्रान्सप्लॅंट करावे लागल्याची ही जगातील पहिली घटना आहे. 3 महिन्यात या मुलावर 4 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यासाठी तीन शहरांमध्ये त्याच्यावर उपचार झाले. डॉक्टरांच्या मते, या प्रकरणात कोरोना फॅक्टर SARS-CoV-2 ची अधिक तीव्रता दिसून आली. वाचा- कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी ऑगस्ट महिन्यात ओमला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या पोटात अचानक दुखू लागल्यामुळे त्याचा एक्स रे काढण्यात आला. यावेळी त्याचे आतडे सडत असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यानंतर त्याच्यावर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पहिली शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याच्यावर तीन शस्त्रक्रीया करण्यात आल्या. लग्नाला आले होते 55 पाहुणे… पण न आलेल्या 177 जणांना झाला कोरोना, 7 दगावले ट्रान्सप्लांट सर्जन गौरव चौबाल म्हणाले की आतड्यांसंबंधी संक्रमण रोखण्यासाठी ऑपरेशन करण्यात आले. यानंतर, गळ्यास बसविलेल्या विशेष पोर्ट्सनं त्याला जेवण देण्यात आले. तीन महिने त्याला नळीतूनच जेवण दिले जात होते. 4 नोव्हेंबरला या ओमला पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. इथं त्याच्यावर आतडे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली. वडिलांनी आपले आतडे दिल्यामुळे ओमचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.