नवी मुंबई, 21 एप्रिल: महाराष्ट्रातून दिवसागणिक समोर येणारी कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. शिवाय राज्यातून अशा काही घटना समोर येतात ज्या चिंता वाढवणाऱ्या ठरत आहेत. अशीच एक घटना पनवेल याठिकाणी असणाऱ्या वृद्धाश्रमात घडली आहे. मुंबईच्या जवळच असणाऱ्या पनवेलमध्ये परम शांतीधाम नावाचा वृद्धाश्रम (Param Shantidham old age home) आहे, या वृद्धाश्रमामध्ये एकूण 58 जणांना कोरोनाची लागण (58 people tested COVID-19 positive) झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण कशामुळे झाली, योग्य खबरदारी घेतली गेली नाही का? असे विविध सवाल या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत. पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तांनी (Commissioner, Panvel Municipal Corporation) अशी माहिती दिली आहे की, ‘याठिकाणी 58 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 16 जणांना ऑक्सिजनची गरज होती असल्याने त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वृद्धाश्रमात आयसोलेट करण्यात आलेल्या व्यक्तींचे परीक्षण केले जात आहे.’
रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये कोरोनाची आकडेवारी सर्वाधिक आहे. याठिकाणी दररोज 400 ते 500 नव्या रुग्णांची नोंद होत असते. अशावेळी वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी अशाप्रकारे हलगर्जीपणा होणं, अतिशय धोकादायक आहे. हा वृद्धाश्रम ब्लॉक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. (हे वाचा- महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांसोबतच मृतकांचा आकडाही मोठा ) महाराष्ट्रात कोरोना बाधितांसोबतच मृतकांचा आकडाही वाढत (Covid patients death number increase) आहे. 5 दिवसांत (मंगळवार 20 एप्रिलपर्यंत) राज्यात तब्बल 2190 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत.