नवी दिल्ली, 26 जानेवारी : आज प्रजासत्ताक दिन… या दिवशीच कोरोना बाबत सर्वात मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. आता यापुढे कोरोना लशी चं इंजेक्शन घेण्याची गरज नाही. कारण आता भारताने कोरोना लढ्यात आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. ज्यामुळे यापुढे आता कोरोनाचं इंजेक्शन घेण्याची गरज नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही गूड न्यूज दिली आहे. भारताने कोरोना लढ्यात टाकलेलं आणखी एक पाऊल म्हणजे नाकावाटे दिली जाणारी लस. भारतातील पहिली मेड इन इंडिया नेझल व्हॅक्सिन इनकोव्हॅक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्यासाठी असलेल्या सार्वजनिक उपक्रमाच्या सहकार्यानं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने ही लस विकसित केली आहे. हे वाचा - 2 वर्षांनी समोर आली Corona vaccine बाबत सर्वात मोठी अपडेट; पुणेकराने सरकारमार्फत मिळवली धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत या लशीचं अनावरण केलं.
आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. जगातील ही पहिली इंट्रानेझल कोरोना लस असल्याचं ते म्हणाले आहेत.
राज्य खासगी रुग्णालयात सरकारे आणि भारत सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील खरेदीसाठी iNCOVACC लशीची किंमत 325 रुपये प्रति डोस/मात्रा इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर खासगी रुग्णालयात या लशीची किंमत 800 रुपयांपर्यंत असेल असं याआधी सांगण्यात आलं होतं. हे वाचा - कोरोना लस घेतलेल्यांनो सावधान! राज्यातील XBB.1.5 व्हेरिएंट इतका खतरनाक की तुमचा जीवही धोक्यात ही लस कोरोनाचा पहिला, दुसरा डोस तसंच आधी दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी बुस्टर डोस म्हणूनही घेता येईल.