JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Vitamin D च्या कमतरतेमुळे कोरोनाव्हायरसचा धोका, संशोधनात समोर आली बाब

Vitamin D च्या कमतरतेमुळे कोरोनाव्हायरसचा धोका, संशोधनात समोर आली बाब

एका संशोधनात व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि कोरोनाव्हायरसचा (coronavirus) चा संबंध दिसून आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 03 मे : व्हिटॅमिन डीच्या (Vitamin D) कमतरतेमुळे हाडांच्या समस्या बळावतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोनाव्हायरसचाही (Coronavirus) धोका आहे. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास कोरोनाव्हायरसचं संक्रमण आणि त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त वाढते, असं या संशोधनात दिसून आलं आहे. डेली मेल च्या रिपोर्टनुसार ब्रिटनमधल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि कोरोनाव्हायरसचा संबंध दिसून आला आहे. हे वाचा -  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Work From Home, घरात स्ट्रेस इटिंगपासूनही बचाव करा संशोधकांनी 20 युरोपीय देशातील कोरोना रुग्णांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू याचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासात दिसून आलं की, ज्या रुग्णांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होती, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त होतं. कोरोनाव्हायरसच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप, शरीरात वेदना, थकवा, स्नायू, हाडांमध्ये वेदना अशी लक्षणं दिसून असतात. अशाप्रकारे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही शरीरात थकवा, अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना जाणवतात. हे वाचा -  पाच मुलींना द्यावी लागेल ‘कोरोनाची अग्निपरीक्षा’, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तणाव वाढतो. डिप्रेशन आणि स्ट्रेसची समस्या निर्माण होते. व्हिटॅमिन डीचा मूड स्विंग्सवरही परिणाम होतो. जास्त वेळ घरात राहिल्यानं सूर्यप्रकाश न मिळाल्याने किंवा प्रदूषण असलेल्या वातावरणात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होते. अशात व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढायला हवी, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट द्यायला हवं, असं क्विन एलिझाबेथ फाऊंडेशन ट्रस्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजेलियाच्या शास्त्रज्ञांनी आपल्या रिसर्चमध्ये लिहिलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  ‘आता थुंकणं पुन्हा सुरू होईल’ सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीनाची नाराजी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या