नवी दिल्ली, 19 जानेवारी : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लढ्यात भारतानं (india) आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. देशात दोन कोरोना लशींच्या वापराला आपात्कालीन मंंजुरी दिल्यानंतर आता Nasal corona vaccine म्हणजे नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या लशीच्या ट्रायललाही मंजुरी देण्यात आली आहे. भारताला पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिन देणाऱ्या भारत बायोटेक (bharat biotech) कंपनीनंच नाकावाटे दिली जाणारी लस तयार केली आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीनं ही परवानगी दिली आहे. लवकरच या लशीचं ट्रायल सुरू होणार आहे. याआधी भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस ही इन्जेक्शनमार्फत दिली जाणारी आहे. आता लवकरच नाकावाटेही लस दिली जाईल. हे वाचा - …तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी याआधी सीएनएन न्यूज 18 शी बोलताना सांगितलं होतं की, फक्त nasal vaccine तुम्हाला फुफ्फुसातील इन्फेक्शनपासून संरक्षण देऊ शकते, त्यानंतरच तुम्ही पूर्णपणे संसर्ग रोखू शकता. जर ही लस प्रभावी ठरली तर ती गेम चेंजर ठरेल, असा विश्वास नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला आहे. हे वाचा - कोविड-19 लशीसंबधित सर्व माहिती खुली करावी; वैद्यकीय तज्ज्ञांनी केली मागणी देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि आजारी असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणीसाठी Cowin app उपलब्ध करून देण्यात आलं आहे.