नवी दिल्ली, 31 मे : भारतात (India) एकूण कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 1,82,143 झाली आहे. हा आकडा इतक्या झपाट्याने वाढू लागला आहे की, जगात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर आहे. भारतात सर्वात पहिलं कोरोना प्रकरण 30 जानेवारीला केरळमध्ये आढळळं होतं. 24 मार्चपर्यंत 512 कोरोना रुग्ण होते. सर्वात पहिला लॉकडाऊन 25 मार्च रोजी लागू करण्यात आला होत, जो 21 दिवसांचा होता. या 21 दिवसांमध्ये कोरोनाव्हायरसची 10,877 प्रकरणं होती. त्यानंतर 15 एप्रिलपासून दुसरा लॉकडाऊन सुरू झाला जो 3 मे पर्यंत म्हणजे 19 दिवस होता. यादरम्यान 31,094 प्रकरणं समोर आली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपला. 18 मे सकाळी आठपर्यंत 53,636 प्रकरणं आढळली. 18 मे ते 31 मे या चौथ्या लॉकडाऊनमध्ये 85,974 कोरोना प्रकरणांची नोंद आहे. रविवारी सर्वात जास्त रुग्णांची नोंद भारतात आज सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांत 8380 नवीन रुग्ण आढळले आणि 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 143 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला. हे वाचा - चिंताजनक! फक्त चौथ्या लॉकडाऊनमध्येच भारतात तब्बल 47% कोरोना रुग्णांची नोंद आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 89995 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86983 लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 2,940 नवीन रुग्ण समोर आले आहेत तर 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 65,168 वर पोहोचली आहे. अमेरिका सर्वात जास्त कोरोना प्रभावित जगात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू हे अमेरिकेत आहेत. जगभरात एकूण 6,185,076 कोरोना रुग्ण आहेत त्यापैकी अमेरिकेत 1,817,409 आहेत. तर जगातील एकूण 371,398 कोरोना रुग्णांचा मृत्यूपैकी 105,575 मृत्यू फक्त अमेरिकेत झालेत. हे वाचा - पावसाळ्यात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढणार; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?