JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण

दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण

रोपर आयआयटीच्या (IIT Ropar) इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम (infrared vision system) तयार केलं आहे.

जाहिरात

Pic credit - IIT Ropar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 26 एप्रिल : एखादी व्यक्ती कोरोना (Corona) संशयित आहे की नाही हे तपासण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं, हे तपासण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. ज्यामुळे एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर दुसऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका असतो. मात्र आता शास्त्रज्ञांनी असं उपकरण तयार केलं आहे, ज्यामुळे दूरूनच चेहरा पाहून एखादी व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजणार आहे. रोपर आयआयटीच्या (IIT Ropar) इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम (infrared vision system) तयार केलं आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्ती स्वत:चा चेहरा स्कॅन करेल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवर ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या

शास्त्रज्ञांनी सांगितलं, इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम 160x120 पिक्सेल रेजोल्युशनसह विविध प्रकारचं तापमान मोजतो. यह उपकरण छोटं, सुरक्षित आणि कोणत्याही व्यक्तीशिवाय तपासणी करण्यास सक्षम आहे. हे वाचा -  प्रत्येक व्यक्तीमध्ये Corona ची विविधं रूपं; का करतोय व्हायरस स्वत:मध्ये बदल? आयआयटी रोपरमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील असोसिएट प्रोफेसर रवीबाबू मूलवीशला यांनी सांगितलं, “एखाद्या व्यक्तीमध्ये ताप किंवा सर्दी अशी कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत का? तसंच ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी आहे हे ओळखण्यासाठी हे उपकरण मदत करेल. मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकांची तपासणी करण्यासाठी हे उपकरण खूप फायदेशीर ठरेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या