JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनामुळे टीनएजर्सचा मेंदू होतोय अकाली वृद्ध; संशोधकांचा धक्कादायक दावा

कोरोनामुळे टीनएजर्सचा मेंदू होतोय अकाली वृद्ध; संशोधकांचा धक्कादायक दावा

कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमध्ये असलेल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या मेंदूत आमूलाग्र बदल झाला असून, त्यांच्या मेंदूला अकाली वृद्धत्व आल्याचा भयावह निष्कर्ष एका नवीन संशोधनातून समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला अनेक वर्ष मागे नेलं आहे. कोरोनाचा प्रभाव संपूर्ण पिढीवर किती वर्षं राहील हे कोणी सांगू शकत नाही. सध्या कोरोनाने इतक्या वेदना दिल्या आहेत, की त्याची भरपाई करणं कठीण आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमध्ये असलेल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या मेंदूत आमूलाग्र बदल झाला असून, त्यांच्या मेंदूला अकाली वृद्धत्व आल्याचा भयावह निष्कर्ष एका नवीन संशोधनातून समोर आला आहे. म्हणजेच माणसाच्या मेंदूत काळानुरुप जे बदल घडतात, ते बदल किशोरवयातच झाले आहेत. कोरोनामुळे मुलांमध्ये आळस, अस्वस्थता, स्क्रीनचं व्यसन, गैरवर्तनासह अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. मुलांमध्ये केवळ शारीरिकच नाही, तर व्यावहारिक बदलही झाले आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका नवीन अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की साथीच्या आजाराशी संबंधित तणावामुळे किशोरवयीन मुलांच्या मेंदूत बदल झाला आहे. यामुळे त्यांच्या मेंदूची रचना त्यांच्या मित्रांच्या मेंदूच्या तुलनेत जुनी झाल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा :  महिलानंतर आता 18-25 वयातील तरुणांना मिळणार मोफत कंडोम; आधुनिक देशावर का आली अशी वेळ? मेंदूचा भाग होऊ लागतो सडपातळ टीओआयच्या वृत्तानुसार, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक इयान गॉटलिब यांच्या मते, `मेंदूच्या रचनेत काळानुरुप बदल होणं स्वाभाविक आहे. प्युबर्टीच्या सुरुवातीला मुलांचं शरीर वेगाने विकसित होत असतं. या दरम्यान, मेंदूतले हिप्पोकॅम्पस आणि अ‍ॅमिग्डेला हे भाग वेगाने विकसित होतात. मेंदूतले हे भाग स्मरणशक्ती आणि भावनांवर नियंत्रण ठेवतात. त्याच वेळी मेंदूच्या पेशींचा काही भाग पातळ होतो.` संशोधकांनी संशोधनादरम्यान कोरोनापूर्वी आणि दरम्यानच्या काळातल्या 163 मुलांच्या एमआरआय स्कॅनच्या डेटाचं विश्लेषण केलं. त्यात असं दिसून आलं, की लॉकडाउनदरम्यान, किशोरवयीन मुलांचा मेंदू खूप विकासित झाला. त्यामुळे मेंदू वृद्ध होण्यास सुरुवात झाली. हा अभ्यास बायोलॉजिकल सायकिअ‍ॅट्री ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हेही वाचा :  हसत्याखेळत्या माणसांचा हार्ट अटॅकने का जातोय जीव; तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण संपूर्ण पिढीवर धोक्याचे सावट संशोधकांनी सांगितलं, `आतापर्यंत जी मुलं कोणत्याही प्रतिकूल क्रॉनिक आजाराने ग्रस्त होती, त्यांच्या मेंदूत अशा प्रकारचा बदल दिसून आला आहे. दुर्लक्ष, हाणामारी आणि कौटुंबिक अकार्यक्षमता अशा कारणांमुळे मुले अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत किशोरवयीन मुलांचा मेंदू अकाली वृ्द्ध होण्यास सुरुवात होते.``पौगंडावस्थेत मेंदूच्या संरचनेत आढळणारे बदल कायमस्वरूपी आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,` असं गोटलिब यांनी सांगितलं. `या प्रकारच्या मानसिक बदलामुळे या वयाच्या किशोरवयीन पिढीला नंतर त्रास सहन करावा लागला. साधारणपणे 70 - 80 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींच्या मेंदूतल्या बदलांमुळे बौद्धिक क्षमता आणि स्मरणशक्तीशी निगडित समस्या उद्भवतात; मात्र 16 -17 वर्षांच्या वयोगटात असे बदल झाल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे सध्या सांगता येणार नाहीत,` असं संशोधकांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या