JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona विरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती

Corona विरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती

कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संक्रमण ओळखण्यासाठी कुत्र्यांना (dogs) प्रशिक्षण दिलं जातं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाशिंग्टन, 30 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरनं (Coronavirus) थैमान घातलं आहे, त्याच्यावर अद्याप सापडलेला नाही. त्यात हा व्हायरस आपली रूपं बदलतो आहे. आता तर अनेक कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणंही दिसत नाहीत. अशावेळी कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचं निदान करणं म्हणजे कठीणच आहे. त्यामुळे आता कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी आता कुत्र्यांची (dogs) मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि लंडनमध्ये कोरोनाव्हायरसचं संक्रमण ओळखण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जातं आहे. वॉशिंग्टन पोस्ट मधील वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये एक रिसर्च टीम कुत्र्यांना कोरोना संक्रमण ओळखण्यासाठी तयार केलं जात आहे. लेब्राडोर रिट्रीवर जातीच्या कुत्र्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे. हे वाचा -  ‘चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो’, चीनच्या दाव्यात किती तथ्य? पेन्सिल्वेनिया स्कूल ऑफ वेटनरी मेडिसीनचे डायरेक्टर सिंथिया एम यांच्या मते, “संशोधनात दिसून आलं की, प्रत्येक व्हायरसचा स्वत:चा एक गंध असतो” सिंथिया यांच्यासह काम करणारे ओट्टो म्हणाले, ठआम्हाला माहिती नाही हे गंध किती मजबूत असतात. मात्र श्वान असेच काम नाही करत. सामान्यपणे ते सामान्य सॅम्पल आणि अस्तित्वात असलेलं सॅम्पल यांच्या गंधात काही अंतर तर नाही ना, हे समजून घेतात आणि याच सिद्धांतावर कमीत कमी प्रत्येकाची टेस्ट करावी नाही लागणार.ठआतापर्यंत ड्रग्ज, बॉम्बसारखे विस्फोटक पदार्थांचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांचा वापर होत आला आहे. हे वाचा -  Coronavirus ‘चीनी’ व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर अमेरिकेप्रमाणे लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्येही असाच प्रयोग सुरू आहे. इथल्या रिसर्च टीमने सांगितल्यानुसार, कुत्रा मलेरियाग्रस्त व्यक्तीची ओळख पटवण्यात सक्षम आहेत. या स्कूलच्या डिसीज कंट्रोल विभागाचे अध्यक्ष जॉन लोगन सांगतात, “अशाप्रकारच्या महासाथीशी लढण्यासाठी कुत्रा खूप फायदेशीर ठरू शकतो. जितक्या लवकर संक्रमणाची माहिती होईल, तितकंच त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल. काही आठवड्यांतच आम्ही कुत्र्यांना कोरोना संक्रमण ओळखण्यासाठी ट्रेन करू” कुत्र्यांच्या नाकाप्रमाणे डिव्हाइस बनवणार ओट्टो म्हणाले, “आम्ही कुत्र्यांना ट्रेनिंग तर देत आहोत, मात्र यामुळे समस्या सुटणार नाही. कितीही कुत्र्यांना ट्रेन केलं तरी अमेरिकेतल्या सर्व विमानतळांसाठी पुरेसे ठरणार नाहीत. जर कुत्रे या व्हायरसला ओळखण्यात सक्षम झाले, तर आम्ही कुत्र्यांच्या नाकाप्रमाणेच एक इलेक्ट्रॉनिक नाक बनवू शकतो, जे सेंसरवर काम करेल आणि यामार्फत हजारो लोकांचं स्क्रिनिंग करणं सोपं होईल” संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या