नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेक रुग्णांना समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशचा (Post covid complication) सामना करावा लागतो आहे. अशाच पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमुळे प्रकृती गंभीर झालेल्या एका रुग्णाला जीव वाचवण्यासाठी आपलं फुफ्फुस आणि किडनी काढून टाकावी लागली (Man’s kidney, lung removed after mucormycosis). जगातील हे पहिलं प्रकरण जे भारतातील आहे. गाझियाबादमधील (Ghaziabad) 34 वर्षांचा रुग्ण. त्याला कोरोनानंतरच्या समस्या म्हणजे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होते. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. तीव्र ताप होता. त्याला म्युकरमायकोसिस म्हणडे ब्लॅक फंगस असल्याचं निदान झालं. या रुग्णाच्या किडनी, फुफ्फुसात आणि सायनसमध्ये म्युकरमायकोसिस (mucormycosis) म्हणजे ब्लॅक फंगस (Black fungus) झाल्याचं निदान झालं. हे वाचा - बापरे! लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) या रुग्णालवर उपचार झाले. वैद्यकीय इतिहासात जगातील हे पहिलं प्रकरण आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. कोरोनानंतर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस आढळून येत आहे. ज्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईड दिलं जातं आहे, त्यांना याचा धोका जास्त आहे. हा वेगाने पसरणारा आजार आहे, त्यामुळे इतर अवयवांनाही हानी पोहोचवू शकतो. या रुग्णाच्या फुफ्फुसाचा निम्मा भाग आणि किडनी दोन्ही खराब झाले होते आणि इन्फेक्शन अधिक पसरण्याचा धोका होता. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा काही भाग आणि उजवी कि़डनी काढून टाकावी लागली. हे वाचा - अरे बापरे! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख सहा तास ही सर्जरी झाली. रुग्णावर यशस्वी ऑपरेशन झालं असून त्याला आता डिस्चार्ज देण्यात आल्याचंही रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.