नवी दिल्ली, 13 मे: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) गुरुवारी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) ला 2 ते 18 वयोगटासाठी त्यांची लस कोवॅक्सिनची क्लिनिकल (Covaxin Clinical Trial for age group of 2 to 18) चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित या कंपनीने म्हटले आहे की भारत बायोटेक ही चाचणी 525 निरोगी स्वयंसेवकांवर करणार आहे. ही त्यांची दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचणी असेल. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (Central Drugs Standard Control Organization CDSCO) कोव्हिड-19 बाबतच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) कोव्हॅक्सिनची ट्रायल 2 ते 18 वयोगटासाठी केली जावी, याबाबत शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सावधानीपूर्वक तपासणी केल्यानंतर याकरता परवानगी दिल्याची माहिती सरकारने दिली आहे.
हे वाचा- कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, NTAGI चा सल्ला सरकारने अशी माहिती दिली आहे की, या ट्रायल दरम्यान लस 28 दिवसांच्या अंतराने दोन डोसमध्ये स्नायूद्वारे दिली जाईल. रॅपिड रेग्यूलेटरी रिस्पॉन्सबाबत, या विषयावर SEC ने मंगळवारी चर्चा केली होती. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला फेज II/III मध्ये 2 ते 18 वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मिळावी अशी मागणी हैदराबाद स्थित भारत बायोटेककडून करण्यात आली होती. कोव्हॅक्सिन डोसची सुरक्षितता, रिअॅक्टोजेनिसीटी आणि इम्युमोजेनिसीटीचं मुल्यांकन करण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात सविस्तर विचार केल्यानंतर या तज्ज्ञांच्या पॅनेलकडून याबाबत शिफारस करण्यात आली होती.