JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / जुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS! विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा

जुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS! विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा

कोरोनाच्या महासाथीला, तिसऱ्या लाटेला घाबरू नका, असा सल्ला विषाणू तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विवेक आनंद/नवी दिल्ली, 22 जून : भारतात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) नियंत्रणात आलेली असताना तिसरी लाट (Corona third wave) येणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यासाठी सरकारने तयारीही सुरू केली आहे. दिल्लीतील एम्सचे (AIIMS) डॉक्टर रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी जर कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केलं नाही तर पुढील सहा ते आठ आठड्यांत कोरोनाची तिसरी लाट देशात येऊ शकते, असं म्हटलं आहे. पण विषाणू तज्ज्ञांनी मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निराधार आहे. देशात कोरोना संक्रमण वाढण्याबाब कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 ने अमेरिकेतील विषाणू तज्ज्ञ डॉ. टी. जॅकब आणि डॉ. रवी गोडसे यांच्याशी भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मोठा दिलासा दिला आहे.

डॉ. जॅकब यांनी सांगितलं, “जोपर्यंत देशात कोरोनाव्हायरसचा कोणता नवा व्हेरिएंट समोर येत नाही, तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता नाही. सध्याचा कोरोना व्हेरिएंट संक्रमणात वाढ करू शकत नाही . जुलैच्या अखेरपर्यंत महासाथ सातत्याने कमी होईल. प्रभावी रणनीतीमुळे आपण कोरोनातून बाहेर पडू शकतो” हे वाचा - मेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर? तर अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे म्हणाले, “माझ्या मते, भारतात कोणीही संक्रमित होण्यापासून वाचलं नाही आहे. पण ज्यांना कोरोना झाला ते बरे झाले आहेत. लसीकरण योग्य प्रमाणात झालं आहे.  लसीकरण सुरू आहे. लहान मुलांना काही नाही होणार. मला याबाबत खूप विश्वास आहे. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. भारताची इम्युनिटी सर्वात चांगली आहे” हे वाचा -  4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस? “कोरोना प्रकरणं येतील पण लाट येणार नाही. घाबरू नका. हिंमत ठेवा.  1 जुलैला अंत होणार. भीतीमुळे प्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. संपूर्ण भारतात 2 ऑक्टोबरपर्यंत चेहऱ्यावरील मास्कही उतरतील”, असा दावा डॉ. गोडसे यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या