मुंबई, 03 मे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) देशातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं होती. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशातील दहा जिह्यांमध्ये महाराष्ट्रातीलच (Coronavirus Cases in Maharashtra) 8 ते 10 जिल्हे होते. त्याच महाराष्ट्राबाबत केंद्राने आता दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील कोरोना प्रकरणं कमी झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे. देशातील कोरोना परिस्थितीबाबत (Coronavirus In India) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं कमी झाल्याचं सांगितलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांचा समावेश आहे.
27 एप्रिल, 2021 पासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणं घटल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. हे वाचा - BMC चा ‘तो’ निर्णय चुकला? आता ‘या’ गोष्टीने वाढवलं मुंबईकरांचं टेन्शन राज्याच्या आकडेवारीनुसारही राज्यात रुग्णवाढीला आता ब्रेक लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत होती. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान (56647 new cases) झालं आहे. जे कालच्या तुलनेत जवळपास 6600 हून कमी आहे. 1 मे रोजी राज्यात 63282 नवीन रुग्णांचे निदान झाले होते. म्हणजेच दैनंदिन रुग्णसंख्येत सहा हजारांहून अधिक घसरण झाली आहे आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही एक दिलासादायक बातमी आहे. रविवारी राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 51,356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,81,658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47,22,401 म्हणजेच 17.8 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे वाचा - Good News मुंबई 1 जूनपासून येऊ शकते रुळावर, 1 जुलैपासून शाळाही शक्य पण… याआधी महाराष्ट्रामुळे मोदी सरकारची चिंता वाढली होती. पण आता आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढली आहेत.