नवी दिल्ली, 28 मे : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लस (vaccine) कधी येईल, याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र कोरोनाव्हायरसची लस आली तरी कदाचित कोरोनाव्हायरसचा पाठलाग सोडणार नाही. तो आपल्यासोबत असाच कायम राहिल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरसची लस आली तरी कोरोनाव्हायरस जाणार नाही. एचआयव्ही, गोवर, कांजण्या यांच्यासारखा तो स्थानिक होऊन जाईल. यूएस डेलीनुसार, तज्ज्ञांच्या मते आधीपासूनच चार स्थानिक कोरोनाव्हायरस आहे, ज्यांच्यामुळे सामान्य सर्दी आहे आणि तज्ज्ञांच्या मते कोरोनाव्हायरस पाचवा होईल हे वाचा - ट्रम्प, झुकरबर्ग आणि ट्विटर यांच्यात का रंगलय शाब्दिक युद्ध? वाचा काय आहे वाद याचा प्रभाव हळूहळू कमी होईल कारण लोकांची प्रतिकारक शकती वाढेल आणि आपलं शरीर वेळेसह यासाठी अनुकूल होईल. तज्ज्ञांनी सांगितलं कोविड-19 हा दीर्घकाळ राहणारा व्हायरस आहे. याचा अर्थ परिस्थिती नेहमी भीषण राहिल. शिकागो युनिव्हर्सिटीतील सारा कोबे म्हणाल्या हा व्हायरस इथंच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आपण त्याच्यासह सुरक्षितरित्या कसं जगणार आहोत हे वाचा - एका महिलेमुळे आख्ख गाव झालं सील, डॉक्टरसह 29 जण होम क्वारंटाईन स्थानिक आजारांशी लढण्यासाठी दूरचा विचार, सातत्याने प्रयत्न, आंतराराष्ट्रीय समन्वयाची गरज असते. व्हायरसचा नाश कऱण्यासाठी दशकं लागू शकतात. अशा प्रयत्नांसाठी वेळ, पैसे आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं