JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Corona Vaccine : कोरोनावर लस मिळाली, पण पाकिस्तानला वाटते याची मोठी भीती

Corona Vaccine : कोरोनावर लस मिळाली, पण पाकिस्तानला वाटते याची मोठी भीती

Pakistan Corona vaccine: नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने (NCOC) कोरोना लसीला दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यात म्हटले आहे की चीनमध्ये निर्मित कोरोना लस सिनोफॉर्म सध्या पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचार्‍यांना दिली जात आहे.

जाहिरात

Pakistan Corona news

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाकिस्तान, 4 फेब्रुवारी: उशिरा का होईना पण पाकिस्तानमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona vaccine)  मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानला (Pakistan) कोरोनावरील 5 लाख लस देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. लसीची पहिली खेप पाकिस्तानमध्ये पोहचली असून लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. एकीकडे पाकिस्तानला लस मिळाल्याचा आनंद आहे तर दुसरीकडे इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) सरकारला देशातील दहशतवादी लसीची खेप लूटन घेऊन जातील याची भीती आहे. देशात वाढलेल्या दहशतवादी संघटनांपासून कोरोनाची लस  सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याद्वारे सैन्य तैनात करून, सीसीटीव्हीवरुन पाळत ठेवण्यासह बऱ्याच व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यासोबतच नॅशनल कमांडर अँड ऑपरेशन सेंटरने (NCOC) कोरोना लसीला दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक गाइडलाइन जारी केली आहे. तसंच, पाकिस्तानमध्ये इंटरपोलने फसवणूक, चोरी आणि बेकायदेशीर जाहिरातीबाबत अलर्ट जारी केला आहे. दहशतवादी हल्ला किंवा कोरोना लसीला बनावट लसीमध्ये बदलण्यापासून रोखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी या लसींची वाहतूक, साठवण आणि प्रशासनासाठी योजना आखल्या जात आहेत. स्थानिक गुन्हेगार आणि दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी कोरोना लसीला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

हे देखील वाचा - कोरोना लशीनं केली कमाल! पहिल्या डोसनंतरच 67 टक्क्यांनी घटला संसर्ग

संबंधित बातम्या

नॅशनल कमांडर अँड ऑपरेशन सेंटरने जारी केलेल्या गाइडलाइनमध्ये असे म्हटले आहे की, ‘कोरोना लस घेऊन जाणाऱ्या वाहनांसोबत पोलीस, रेंजर्स किंवा सैन्य असणे बंधनकारक आहे. यासोबत ताफ्यामध्ये अज्ञात सुरक्षाही असेल.’ यामध्ये हे सुद्धा सांगितले आहे की, ‘चीनने तयार केलेली सिनोफोर्म ही कोरोना लस पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. 1 फेब्रुवारीला देशभरातील सर्व प्रांतांमध्ये 70 हजार लशी पाठवण्यात येणार आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या