या दिवसात सर्वाधिक कोरोनाचा धोका.
नवी दिल्ली, 17 जून : देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं (Corona third wave) संकट घोंघावतं आहे. महाराष्ट्रात दोन ते चार आठवड्यांतच कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave in maharashtra) येणार आहे, असा इशारा राज्याच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने तयारीही सुरू केली आहे. दरम्यान या लाटेचा परिणाम काय असू शकतो, याबाबत जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि एम्सने (AIIMS) रिपोर्ट जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि एम्सने (AIIMS) पाच राज्यांमध्ये सर्व्हे केला आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिरोप्रिव्हेलेन्स (seroprevalence) दिसून आला आहे. म्हणजे या मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आहेत, त्यामुळे मुलांना तिसऱ्या लाटेपासून संरक्षण मिळू शकेल, असं या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. हे सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे. तपासणीच्या मध्यातील अहवाल जारी करण्यात आला आहे. चार राज्यांतील 4500 लोकांवर आधारीत हा डेटा आहे. येत्या काही महिन्यात याबाबत अधिक माहिती मिळेल. हे वाचा - लहान मुलांना जुलैमध्ये देणार कोरोना लस; पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट तयार महाराष्ट्रात 2-4 आठवड्यांतच कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. कोविड टास्क फोर्सने याबाबत सावध केलं आहे. राज्यातील तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. राज्यातील कोविड टास्क फोर्सने या बैठकीत सावधानतेचा इशारा दिला आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. टास्क फोर्सने सांगितलं, तिसऱ्या लाटेत एकूण कोरोना प्रकरणं, अॅक्टिव्ह केसेस दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पट होऊ शकतात. अॅक्टिव्ह केसेस आठ लाखांपर्यंत पोहोचू शकतात. यापैकी 10 टक्के प्रकरणं लहान मुलं, तरुण किंवा वृद्ध व्यक्ती असू शकतात. पण लहान मुलांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निम्न मध्यम वर्गाला या लाटेचा जास्त धोका आहे कारण पहिल्या दोन लाटेपासून ते वाचले आहेत किंवा त्यांच्यातील अँटीबॉडीज कमी झाल्या असाव्यात. हे वाचा - गंभीर! ‘या’ 4 राज्यात अजूनही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखांवर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं (Maharashtra Government) आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्या.