आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.
बीजिंग, 12 ऑगस्ट : एकीकडे जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रशियानं (Russia) कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाने जगातील पहिली कोरोनाव्हायरस लस बनविण्याची घोषणा केली असून त्याचे उत्पादन सप्टेंबरपासूनच सुरू होणार आहे. रशियानंतर आता आणखी एक चांगली बातमी चीनमधून येऊ शकते. माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक लसीने (Sinovac biotech vaccine) मंगळवारी कोव्हिड -19 लशीच्या मानवी चाचणीचा अंतिम टप्पा सुरू केला आहे. असा विश्वास आहे की लवकरच चीन लशीबाबत घोषणा करेल. जागतिक आरोग्य संघटनाच्या (WHO) म्हणण्यानुसार, Sinovac ही लस अग्रगण्य 7 लशींपैकी एक आहे. इंडोनेशियातील 1620 रूग्णांवर Sinovac लशीची चाचणी केली जात आहे. ही लस इंडोनेशियातील सरकारी मालकीच्या बायो फार्माच्या सहकार्याने तयार केली जात आहे. यापूर्वी मंगळवारी Sinovac ने माहिती दिली की चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस सुरक्षित सापडली आहे आणि रुग्णांमध्ये अॅंटिबॉडी आधारित इम्यून रिस्पॉन्स आढळून आले आहेत. कोरोनाव्हॅक नावाची ही लस चाचणीच्या या टप्प्यात पोहोचलेल्या काही प्रभावी लशींपैकी एक आहे. वाचा- 20 देशांकडून ऑर्डर; भारतातही दिली जाणार का रशियन लस? AIIMS ने दिली माहिती
वाचा- 102 दिवसांनी न्यूझीलँडमध्ये कोरोनाची पुन्हा एंट्री; लोकल ट्रान्समिशनमुळे चिंता तिसऱ्या ट्रायलनंतर होणार घोषणा Sinovac चे इंडोनेशियातील ट्रायल सध्या तिसर्या टप्प्यात आहेत. सध्या दक्षिणपूर्व आशियात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारपर्यंत 1 लाख 27 हजारहून अधिक रुग्ण आहेत. सध्या या चाचणीसाठी 1215 लोकांनी निवड करण्यात आली आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो म्हणाले की, “जोपर्यंत ही लस सर्व लोकांना दिली जात नाही तोपर्यंत कोव्हिड -19 चा धोका टाळता येणार नाही”. वाचा- रशियाने बनवली जगातील पहिली कोरोना लस; सुरक्षिततेबाबत WHOने दिली मोठी माहिती इंडिनेशियामध्येही तयार केली जात आहे लस बायो फार्मा आणि Sinovac शिवाय इंडोनेशियामध्ये लस तयार केली जात आहे. उत्पादन, इंडोनेशियन खाजगी कंपनी काल्बे फार्मा आणि दक्षिण कोरियाची जेनेक्साइन लस तयार करत आहेत. Sinovac मिड स्टेज किंवा दुसर्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चीनमध्ये 600 लोकांना लस देण्यात आली.