JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / केंद्राने केरळ आणि महाराष्ट्राला केलं अलर्ट; Corona संसर्ग रोखण्यासाठी दिल्या 5 महत्त्वाच्या सूचना

केंद्राने केरळ आणि महाराष्ट्राला केलं अलर्ट; Corona संसर्ग रोखण्यासाठी दिल्या 5 महत्त्वाच्या सूचना

गेल्या 24 तासात केरळमध्ये कोरोनाचे 32,801 नवीन रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात येत्या काळात सण-उत्सवांदरम्यान रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : महाराष्ट्र आणि केरळमध्ये (Maharashtra and Keral) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) वाढणारी संख्या पाहता केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात केंद्राने राज्यांना चिठ्ठी लिहिली आहे. आणि संसर्ग कसा कमी करता येऊ शकेल, याबाबत 5 सूचना दिल्या आहे. या पाच सूचनांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कन्टेन्मेंट स्ट्रेटजी, टेस्टिंग, जीनोमिक सर्विलान्स, वॅक्सीनेशन, जिल्हा स्तरावर कसं काम केलं जावं, याची माहिती दिली आहे. (Center warns Kerala and Maharashtra Here are 5 important tips to prevent corona infection ) केंद्राने चिठ्ठीत म्हटलं आहे की, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा येत्या काळात कोरोना रुग्णसंख्येत वाढ करू शकतो. शिवाय जवळील राज्यांनाही याचा त्रास सहन करावा लागेल. केंद्राने राज्य सरकारला आवश्यक पाऊलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. येत्या काळात सणासुदीत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन केंद्राने महाराष्ट्र सरकारला अलर्ट केलं आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी वाढू शकत असल्याने अधिक सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्राने राज्य सरकारवला टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सीनेशन आणि कोविड अप्रोप्रियट बिहेव्हियरवर जोर देण्याचं आवाहन केलं आहे. हे ही वाचा- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ केरळमध्ये कोरोना संसर्गात वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात केरळमध्ये कोरोनाचे 32,801 नवीन रुग्ण समोर आले आहेत. (Kerala Coronavirus Case updates) तर 179 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,95,254 पर्यंत पोहोचली आहे. तर मृतांची संख्या वाढून 20,313 पर्यंत पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या