JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरतंय जीवघेणं

कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरतंय जीवघेणं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अँटिमलेरिया औषध हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) ला कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचारासाठी पसंती दिली होती.

जाहिरात

ही गोळी मुख्यतः मलेरियासाठी वापरली जाते. याशिवाय अर्थराइट्स, ल्यूपस रुमेटोइड या सारख्या आजारांसाठी वापरली जाते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 22 एप्रिल : कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचारासाठी सध्या ना कोणतं औषध, ना कोणती लस. अद्यापही या व्हायरसवर प्रभावी असे उपचार नाहीत. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अँटिमलेरिया औषध हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) ला कोरोनाव्हायरसवरील उपचारासाठी पसंती दिली. त्यांनी या औषधाला गेम चेंजर म्हटलं. मात्र आता हेच औषध कोरोना रुग्णांसाठी जीवघेणं ठरत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येते आहे. ज्या कोरोना रुग्णांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध दिलं जातं आहे, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे सामान्य पद्धतीनं उपचार केले जाणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ  (National Institutes of Health) आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या (University of Virginia) प्राध्यापकांनी हा अभ्यास केला. सीएनएन ने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा -  Coronavirus चा स्रोत समजल्या जाणाऱ्या वटवाघळाची या गावात केली जाते पूजा संशोधकांनी वेटरन हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशनच्या (Veterans Health Administration medical centers) आकडेवारीचा अभ्यास केला. त्यांना दिसून आलं आहे की, 97% कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आलं त्यापैकी 28% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सामान्य पद्धतीने उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण फक्त 11% आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) औषधामुळे कोरोना रुग्णाची प्रकृती सुरुवातीला सुधारते मात्र त्यानंतर इतकी गंभीर होते की रुग्णाचा मृत्यू होतो. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध जर एजिथ्रोमाइसिनसोबत दिलं, तरीही त्यांची वाचण्याची शक्यता कमी असते, असंही संशोधकांनी म्हटलं. हे वाचा -  ‘या’ व्यक्तीला भेटणं इम्रान यांना पडलं महागात, आयसोलेशनमध्ये आहेत पंतप्रधान हे औषध दिल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीत काय बदल होतात, हेदेखील संशोधकांनी तपासलं. यामुळे  रुग्णांच्या नर्व्हस आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल सिस्टमवर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. फ्रान्समधील संशोधकांनीही असाच अभ्यास केला होता. 181 कोरोना रुग्ण ज्यांना न्यूमोनिया होता आणि वेंटिलेटरची गरज होती, त्यापैकी निम्म्या रुग्णांना 48 तासांत हे औषध देण्यात आलं. तर निम्म्यांना नाही. या दोन्ही गटातील मृत्यू दरात किंवा त्यांची प्रकृती गंभीर होण्यात फारसा फरक नव्हता. उलट ज्यांनी हे औषध घेतलं अशा 8 रुग्णांना हृदयाचे ठोके अनियमित झाले आणि त्यांना हे औषध घेणं थांबवावं लागलं. ही दोन्ही संशोधनं जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले नाहीत, असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या