बीजिंग, 26 जुलै : जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सर्वातआधी सुरुवात झाली. मात्र आता इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. यासाठी चीन एक खास डायट करत असल्याचे समोर आले आहे. चिनी सरकारने लहान मुलांसाठी डायट जारी केले आहे. यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दूध आणि अंड्यांचा वापर करणे सक्तीचे केले आहे. रोज सकाळी लहान मुलांना दूध आणि अंडी दिल्यास त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. दूध आणि अंडी यांच्यात प्रथिने असल्यामुळे नवीन पेशींच्या वाढीस चालना देण्यासाठी हे डायट फायदेशीर आहे. शांघायस्थित हुशान हॉस्पिटलमधील रोग तज्ञ झांग व्हेनहॉंग यांनी सांगितले की, ब्रेड व बल्गर खाण्याची परंपरा आता चालणार नाही. आता नाश्तासाठी पालकांनी मुलांना भरपूर प्रमाणात दूध आणि अंडी देणे गरजेचे आहे. नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारने प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 300 मिली दूध पिणे आणि चार अंडी खाणे बंधनकारक करावे अशी मागणी करण्यात आली. वाचा- तरुणांमध्ये दीर्घकाळही राहू शकतो COVID-19 आजार, अमेरिकन डॉक्टरांचा रिपोर्ट सोशल मीडियावर चर्चांना उधाण चीनमध्ये सोशल मिडीयावर दूध व अंडी खाणे अनिवार्य करण्याच्या योजनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही युझरने कोरोनाशी लढाई करण्यासाठी दूध आणि अंडी मधील पौष्टिक घटकांचा पुरावा विचारला आहे तर, काहींनी काहींनी पारंपारिक चिनी आहारात अतिरिक्त प्राणी प्रथिने समाविष्ट करण्याची गरज आहे का हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच वेळी, दुधाचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाला होणार्या नुकसानीबद्दल काही युझर काळजीत आहेत. वाचा- फक्त ताप कोरोनाचं महत्त्वाचं लक्षण नाही; AIIMS च्या अभ्यासातूनही मिळाला दुजोरा वाचा- GOOD NEWS! कोरोनाचं औषध झालं स्वस्त; फक्त 39 रुपयात मिळणार एक टॅबलेट चीन दुसऱ्या क्रमांकाचा उपभोक्ता अमेरिकेनंतर दुग्धजन्य उत्पादनांचा चीन दुसर्या क्रमांकाचा उपभोक्ता आहे. गायीच्या दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दर पाच वर्षात दरडोई वार्षिक दूध वापराचे प्रमाणही 34 लिटरपर्यंत वाढले आहे. इतकेच नाही तर चीन सरकारने 2025 पर्यंत दुधाचे उत्पादन 45 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या चारासाठी जगभरात जंगलतोड होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, अंडी मिळविण्यासाठी कोंबड्यांवरील प्रतिजैविक इंजेक्शनचा वापर देखील वाढला आहे.