JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ...म्हणून हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी निवडतात Ukraine देश; तुम्हीही जाणून घ्या यामागचं कारण

...म्हणून हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी निवडतात Ukraine देश; तुम्हीही जाणून घ्या यामागचं कारण

आज आम्ही तुम्हाला भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी निवडतात Ukraine देशाला का पसंती देतात? याची काही कारणं सांगणार आहोत.

जाहिरात

शिक्षणासाठी Ukraine देशाला पसंती का जाणून घ्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या वादाला (Russia-Ukraine War) आज हिंसक वळण आलं आहे. आज सकाळी रशियानं युक्रेनवर लष्करी आक्रमण (Russia attacked on Ukraine) केलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध (World war III) सुरु झालं आहे. युक्रेनमध्ये सर्व सत्ता मिलिट्रीनं आपल्या हातात घेतली आहे. यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. मात्र या सगळ्यात आपल्या भारतातील अनेक विद्यार्थी (Indian students in Ukraine) जे परदेश शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले होते अशांचे हाल होत आहेत. मात्र भारतीय विद्यार्थी भारतात शिक्षण सोडून युक्रेनमध्ये (Education in Ukraine) का गेले? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. म्हणून आज आम्ही तुम्हाला भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी निवडतात (Why Indian students choose Ukraine for higher studies) Ukraine देशाला का पसंती देतात? याची काही कारणं सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Ukraine हा देश नेहमीच उच्च शिक्षणासाठी (benefits of study in Ukraine) जगभरातील अनेक देशांच्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिला आहे. युक्रेन एक युरोपियन शैक्षणिक प्रणाली असलेला एक आदरातिथ्य करणारा आणि सुंदर देश आहे. युक्रेनियन विद्यापीठांमध्ये आता तब्बल 76 हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थी शिकत आहेत, जे 154 देशांमधून आले आहेत. भारतातूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे. पण युक्रेनच्या शिक्षण प्रणालीत नेमकं काय आहे? बघूया. इतर देशांमध्ये शिकताना Ukraine सारखी Emergency आल्यास काय करावं? इथे वाचा माहिती Ukraine मध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध शहरांमध्ये महाविद्यालये, संस्था, विद्यापीठे, अकादमी, ज्या विविध क्षेत्रातील उच्च पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवहार ज्ञानही शिकवतात. म्हणून विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनला आहे. Ukraine मध्ये शिक्षणाची माहिती देणाऱ्या एका वेबसाइटनुसार, युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा टेस्ट द्यावी लागत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची प्रक्रिया सुकर होते. Ukraine मध्ये कोणतेही आंतरजातीय संघर्ष नाहीत, धार्मिक दडपशाही नाहीत. युक्रेनियन परदेशी नागरिकांप्रती सहिष्णू आहेत आणि संपूर्ण जगाच्या आदरातिथ्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. म्हणून सर्व देशांतील विद्यार्थी इथे मिळून मिसळून राहतात आणि शिक्षण घेऊ शकतात. Ukraine मध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अमेरिका किंवा युरोपमधील इतर देशांइतकी शिक्षण शुल्काची मोठी रक्कम द्यावी लागत नाही. कमी फी असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी आणि भारतातील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यास पसंती देतात. Career Tips: तुम्हीही करिअरची आतच सुरुवात करताय? मग हे कोर्सेस नक्की येतील कामी Ukraine मधील शिक्षण प्रणाली ही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या देशातील काही नामांकित युनिव्हर्सिटीजमुळे इथे जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. या कारणांमुळे ज्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे असे विद्यार्थी युक्रेनची निवड करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या