JOIN US
मराठी बातम्या / करिअर / नोकरीची सर्वात मोठी संधी! MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार पदभरती; वाचा सविस्तर

नोकरीची सर्वात मोठी संधी! MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार पदभरती; वाचा सविस्तर

पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : कोरोनामुळे (Corona virus) संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीसाठी (Maharashtra jobs) उमेदवारांना वाट बघावी लागतेय. त्यात सरकारी नोकरीच्या जागाही (Government jobs) निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण (Mahatransco) विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी (Doctor Nitin Raut) दिली आहे. महावितरण (Mahadiscom), महापारेषण (Mahatransco) आणि महामात्रनिर्मिती (Mahagenco) या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानं राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. ‘परंतु यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्यानं काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. हे वाचा - आता करिअरमध्ये बिनधास्त जपा कलेची आवड; जाणून घ्या काय आहे Product Designing आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पदभरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या