मुंबई, 10 फेब्रुवारी: सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. भारतीय नौदलाने तरुणांना नोकरीची एक खूप चांगली संधी दिली आहे. या नोकरीसाठी देण्यात आलेल्या पात्रतेच्या अटींनुसार अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित असायला हवा. ही भरती अधिकारी पदांवर होत असून 50 जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी भारतीय नौदलाने अधिकृत नोटीफिकेशन (official notification) जारी केले आहे. त्यामध्ये या पदासाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून ते शिक्षण आणि वयाच्या पात्रतेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात भारतीय नौदलाने जारी केलेले नोटीफिकेशन आणि त्यात दिलेली माहिती. भारतीय नौदलात (Indian Navy) सरकारी नोकरी (government job) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. (Indian Navy Recruitment 2022) भारतीय नौदलात अविवाहित पुरुष उमेदवारांना चार वर्षांच्या बी.टेक पदवी अभ्यासक्रम 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना आणि IT SSC अधिकारी पदांसाठी (Officer post) अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (last day of application) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी या पदांसाठी अद्याप अर्ज केलेला नाही ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. हे वाचा- JOB ALERT: परीक्षा न देताही कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी याशिवाय पात्र उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (Indian Navy Recruitment 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन नेव्ही एसएससी आयटी रिक्रूटमेंट 2022च्या (Indian Navy SSC IT Recruitment 2022) माध्यमातून तुम्ही अधिकृत नोटीफिकेशन (Indian Navy Recruitment 2022) देखील पाहू शकता. Indian Navy Recruitment 2022 या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 50 पदे भरली जाणार आहेत. Indian Navy Recruitment 2022 साठी महत्वपूर्ण तारखा ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 27 जानेवारी 2022 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2021 Indian Navy Recruitment 2022च्या रिक्त जागांचा तपशील या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 50 रिक्त पदे भरली जाणार आहेत. हे वाचा- 10वी पासना लागणार Jobची लॉटरी; मध्य रेल्वेत तब्बल 2422 जागांसाठी बंपर भरती Indian Navy Recruitment 2022 साठी पात्रता निकष अर्ज करणारा उमेदवार हा इंग्लिशमध्ये 60% गुणांसह 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा. तसेच 60% मार्क्ससह कॉम्प्युटर सायन्समध्ये BE/B.Tech/M.Tech/CSE/IT/Software Systems/Cyber Security/System Admin & Networking/Computer Systems & Networking/Date Analytics/artificial Intelligence किंवा MCA केलेला असावा. Indian Navy Recruitment 2022साठी वयोमर्यादा उमेदवारांचा जन्म 02/07/1997 ते 01/01/2003 दरम्यान असावा. तुम्हीही या दिलेल्या पात्रतेसाठी योग्य उमेदवार असाल, तर या पदासाठी अर्ज करू शकता.